शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

सर्वंकष आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:30 IST

‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ या संकल्पनेवर आधारित येत्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ...

सरासरी उत्पन्नात वाढ अपेक्षित : गट शेतीला महत्त्व, कृषि विकासाला प्राधान्यभंडारा : ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ या संकल्पनेवर आधारित येत्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाने सर्वंकष व सर्वसमावेशक उत्पन्नवाढीचा आराखडा तात्काळ तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केल्या. जिल्ह्याचे सद्याचे सरासरी उत्पन्न, मागील तीन वर्षातील उत्पन्न, सर्वात जास्त उत्पन्न घेणारा तालुका, गाव व पीक पद्धती या बाबीचा अभ्यास करुन खरीप हंगाम २०१७-१८ साठी उत्पन्न वाढीचा उपाय व करावयाची कृती या आराखड्यात असणे अपेक्षित आहे.जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केल्या. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर, उपसंचालक माधुरी सोनवाने, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. शासनाने खरीप हंगाम २०१७-१८ या वर्षात उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. पीक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण, प्रसार प्रसिध्दी, शेतकरी प्रशिक्षण, नाविन्यर्पूण बाबी, मृद आरोग्य व सेंद्रिय शेती, कांदा चाळ, नियंत्रित शेती आणि सुक्ष्म सिंचन या बाबीचा या मोहिमेत समावेश आहे.या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शेती उत्पन्न वाढीसंदर्भात महत्वाच्या सूचना केल्या. भंडारा जिल्ह्यात मुख्य पीक धान असून दुसऱ्या स्थानी बांधावरील तूर आहे. या व्यतिरिक्त अनेक शेतकरी विविध प्रयोग करीत असतात. या बाबी लक्षात घेता खरीपासाठी विशेष मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांसाठी पेरणीपूर्व प्रशिक्षण आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्यात शेतकरी जे वाण वापरतात. त्याची उत्पादन क्षमता काय, कुठल्या भागात या वाणाचे जास्त उत्पादन होते. यावर संशोधन करण्यात यावे, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात गट शेतीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असून गट शेतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढीचा प्रयोग यशस्वी करता येतो का? या बाबत कृषि विभागाने आढावा घ्यावा, गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना जिल्हाधिकारी यांनी मांडली आहे.पारंपारिक पध्दती व्यतिरिक्त शेतात अभिनव प्रयोग करुन उत्पन्न वाढविणाऱ्या गटांना रोख स्वरुपात प्रोत्साहनपर बक्षिस देण्याचा विचार जिल्हाधिकारी यांनी बोलून दाखविला. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून कृषि विभागाने प्रशिक्षण मोहिम हाती घ्यावी.या वर्षीच्या खरीप हंगामातील कृषि विभागाचा मुख्य उद्देश उत्पन्न वाढविणे हा असावा असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, यासाठी सरसकट प्रयत्न न करता काही मोजकी व ठराविक शेती गट यासाठी निवडण्यात यावे. याच क्षेत्रात लक्ष केंद्रीत करुन उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यासाठी शेतकऱ्यांना लागणारे सर्व ते सहकार्य कृषि विभागाने करावे, असे ते म्हणाले. बँक कर्ज, खत, बियाणे, तांत्रिक सल्ला, सिंचन, मृद परिक्षण या सर्व बाबी लिंकअप करुन लावणीपासून ते काढणीपर्यंतची नियोजन केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.जिल्ह्याचे सरासरी उत्पन्न हेक्टरी २० क्विंटल असून येत्या खरीप हंगामात सरासरी उत्पन्न २३ ते २५ क्विंटल दर हेक्टरी वाढविण्याचे उद्दिष्टय कृषि विभागाने निश्चित करावे व यासाठी एसओपी व सुक्ष्म नियोजन तयार करण्याचे निर्देश त्यांनी कृषि विभागाला दिले. कृषिला सर्वोच्य प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करुन जिल्हाधिकारी म्हणाले की, पाण्याचा थेंब न थेंब साठविणे, शेती उत्पन्न वाढविणे यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)