शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेसंबंधी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2017 00:37 IST

रस्ता सुरक्षा सप्ताह या अभियानाकडे शासनाची योजना म्हणून न पाहता हा मानवी जीवन वाचविण्याचा उपक्रम आहे.

जिल्हाधिकारी चौधरी यांचे प्रतिपादन : २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभभंडारा : रस्ता सुरक्षा सप्ताह या अभियानाकडे शासनाची योजना म्हणून न पाहता हा मानवी जीवन वाचविण्याचा उपक्रम आहे. ज्या वयात नियमांचे पालन करणे आवश्यक असते त्याच वयात आजची मुलं वेगवान वाहन चालवितात.परिणामी विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी तसेच रस्ता सुरक्षेविषयी जाणीव जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतुक नियंत्रण शाखा भंडारा यांच्या वतीने स्थानिक पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित २८ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस उपअधिक्षक जोगदंड, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे, मुख्याधिकारी अनिल अढागळे व पोलीस निरिक्षक (वाहतूक शाखा) गोकुळ राऊत उपस्थित होते. ‘अपनी सुरक्षा, परिवार की रक्षा, सडक सुरक्षापर ध्यान दे हे ब्रिद असलेल्या २८ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे अप्पर पोलीस अधीक्षक नांदेडकर व पाहूण्यांनी दिप प्रल्वजन करुन उद्घाटन केले. यावेळी रस्ता सुरक्षेसंबंधी माहिती देणाऱ्या घडी पुस्तिकेचे जिल्हाधिकारी व अतिथींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी म्हणाल, देशात २०१५ मध्ये १ लक्ष ८० हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यु झाला. कुठल्याही आजाराने झालेल्या मृत्यू पेक्षा हा आकडा खुप मोठा आहे. वाहतूकीचे नियम व रस्ता सुरक्षा याबाबत दक्षता घेतली असती तर मृत्युची संख्या निश्चितच घटली असती. तरुण पिढी व विद्यार्थी वाहन चालवितांना खबरदारी घेतांना दिसत नाहीत. अशा सर्वांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयात रस्ता सूरक्षा जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. रस्ते अपघातामध्ये अनेक कुटूंबांनी आपला आधार गमाविला आहे. वडिलांनी तरुण मुलगा तर पत्नीनी आपला कर्ता पती गमाविला आहे. अशा वेळी कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळत असून आपण सर्व मिळून वाहतूकीचे नियम पाळणे व रस्ता सुरक्षा याबाबत जागृत राहण्याचा संकल्प करु या!, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे म्हणाले, वाढत्या अपघाताला आपण कारणीभूत असून रस्ता ओलांडतांना तसेच वाहन चालवितांना वाहतूकीचे नियम पाळल्यास अपघात निश्चितपणे टाळता येतील. अप्पर पोलीस अधीक्षक नांदेडकर म्हणाल्या, अपघातात जनहानी होणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ही वाढ रोखण्यासाठी सर्व समावेशक प्रयत्न आवश्यक आहेत. पोलीस विभाग आपल्या परीने कार्य करीत असले तरी नागरिकांनी वाहन चालवितांना स्वत: सोबतच इतरांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे यांनी केले तर आभार पोलीस निरिक्षक गोकूळ राऊत यांनी मानले. रस्ते सुरक्षा संबंधी सादरीकरणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)