शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला जाणार तडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:35 IST

गत काही महिन्यांपूर्वीपासून लाखांदूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात लाखांदूर येथे मोफत पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन ...

गत काही महिन्यांपूर्वीपासून लाखांदूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात लाखांदूर येथे मोफत पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर घेतले जात आहे. या शिबिराला तालुक्‍यातील शेकडो विद्यार्थी, युवकांचा प्रचंड प्रतिसाददेखील लाभत आहे. या शिबिराअंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थी युवकांच्या विविध विषयांतर्गत चाचणी सराव परीक्षादेखील घेण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी या मोफत प्रशिक्षण शिबिराअंतर्गत तालुक्यातील विद्यार्थी युवकांमध्ये प्रचंड उत्साहदेखील दिसून येत आहे. मात्र, या शिबिराचे आयोजक व मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांची बदली करण्यात आल्याच्या माहितीने प्रशिक्षण शिबिराच्या लोकोपयोगी व समाजोपयोगी कार्याला तडा जाण्याची भीती असून तालुक्यातील प्रशिक्षणार्थी युवकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.

याप्रकरणी पोलीस प्रशासनातील वरिष्ठांनी ग्रामीण भागातील युवकांना उपलब्ध होणाऱ्या मोफत प्रशिक्षण शिबिराचा लाभ होण्यासाठी या लोकोपयोगी कार्याच्या समर्थनार्थ आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातील शेकडो प्रशिक्षणार्थी युवकांसह जनतेतून केली जात आहे.