शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

संगनमताने जमीन हडपली

By admin | Updated: July 31, 2015 01:07 IST

पवनी तालुक्यातील सोमनाळा (बुज.) येथील शेतकरी बळीराम चिंगा रामटेके यांच्या जमिनीवरचा अवैध फेरफार करून तत्कालीन तलाठी, कोंढा यांनी रामटेके यांच्या मालकीच्या शेतीपैकी काही शेती दुसऱ्याच्या नावे केली.

पत्रपरिषद : न्यायासाठी शेतकरी फिरतोय दारोदारपवनी : पवनी तालुक्यातील सोमनाळा (बुज.) येथील शेतकरी बळीराम चिंगा रामटेके यांच्या जमिनीवरचा अवैध फेरफार करून तत्कालीन तलाठी, कोंढा यांनी रामटेके यांच्या मालकीच्या शेतीपैकी काही शेती दुसऱ्याच्या नावे केली. सदर शेतकरी दोन वर्षापासून अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी शासनाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या दारोदारी फिरत आहे. पण कोणीही त्याची दखल घेत नसल्याची आपबिती बळीराम रामटेके यांनी पवनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत कथन केली.पत्रकार परिषदेत आपली, आपबिती बळीराम रामटेके यांनी कथन करताना सांगितले की, त्यांची वडिलोपार्जीत शेती मौजा सोमनाळा येथे ख.नं. २५४ त.सा. क्रं. १४ गट नं. ७२/१ आराजी ०.७१ हे.आर. या शेतीचा जुना गट नं. ७२ आराजी १.१५ हे.आर. होता. या शेतीपैकी गोसीखुर्द धरणाच्या कालव्यात ०.४९ हे.आर. जमीन गेली. सदर शेती १९९८ ते २००९ पर्यंत बळीराम रामटेके यांच्याच नावे होती व त्या शेतीवर त्यांचाच कब्जा होता. सदर जमीन सन २००९ मध्ये कोणालाही विकलेली नसताना त्या जमिनीवर २००९ मध्ये हिरकन्या रामटेके यांचे नाव त्या जमिनीच्या गटावर कसे आले हे एक कोडे असून नंतर त्यांना त्या जमिनीचे विक्रीपत्र करून दिले व आता त्या जमिनीवर २००९-१० मध्ये त्या जमिनीवर मुनेश्वर गोस्वामी यांचे नाव आले आहे.तत्कालीन तलाठी कोंढा यांनी वरील व्यक्तीच्या संगनमताने बळीराम रामटेके यांनी जमीन विकलेली नसतानाही केवळ जुन्या गट क्रमांकाच्या ५३२, आराजी ०.९२ हे.आर. शेती पैकी गोसीखुर्द धरणात गेलेली ०.२१ हे.आर. या शेतीच्या आदेशाचा पुरावा सादर करून फेरफार क्रमांक ६१२ दि.१७ आॅगस्ट २००९ ला दिवाणी न्यायालय पवनी केस नं. ७६/९९ सत्र न्यायालय अपील क्रमांक १२०/२००५ नुसार प्रत्यक्षात धरणात गेलेली बळीराम रामटेके यांची ०.४४ हे.आर. १७ आॅगस्ट २००९ ला हिरकन्या जीवन रामटेके यांचे नावे केली.त्यानंतर तीन महिन्यातच हिरकन्या हिने तिचा भाचा मुनेश्वर गोस्वामी यांचे नावाने विक्री करून दिले व २००९ लाच मुनेश्वरने बळीरामकडून बळजबरीने जमिनीचा ताबा घेतला व शेती हडप केली. यासंबंधाने बळीराम यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेवून राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर यांचे अपील क्रमांक १०७९/२०१२ वर ६ नोव्हेंबर २०१२ जा.कं्र. ६१९४ दि. १९ डिसेंबर २०१२ नुसार आदेश झाला असतानाही तहसिलदार पवनी व उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी अजुनपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे अपील दाखल करूनही अजुनपर्यंत कोणताही न्याय मिळाला नाही. त्यामुळे मानसीकता बिघडून न्यायासाठी दारोदार भटकत आहेत. पण अजुनपर्यंत न्याय न मिळाल्याची खंत पत्रकार परिषदेत बळीराम रामटेके यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)