शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जणगणना म्हणजे डोके मोजणे नव्हे

By admin | Updated: June 5, 2014 23:49 IST

ओबीसी समाजाची जनगणना करणे म्हणजे ओबीसीेंचे डोके मोजणे नव्हे, १९३१ मध्ये इंग्रज सरकारने ओबीसी समाजाची जनगणना केली. परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत शासनाने जनगणना केली नाही.

ओबीसी जनजागरण मेळावा : भैय्याजी लांबट यांचे प्रतिपादनभंडारा :  ओबीसी समाजाची जनगणना करणे म्हणजे ओबीसीेंचे डोके मोजणे नव्हे, १९३१ मध्ये इंग्रज सरकारने ओबीसी समाजाची जनगणना केली. परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत शासनाने जनगणना केली नाही. ६५ वर्षाच्या काळातही ओबीसीची मुळ संख्या माहिती नाही. सरकारने संसदेत घोषणा करूनही ओबीसीची जनगणना न करणे म्हणजे ओबीसी समाजाचा अपमान करणे होय, असे प्रतिपादन  भैय्याजी लांबट यांनी केले.ओबीसी सेवा संघ, भंडारा द्वारा हत्तीडोई येथे ओबीसी सेवा संघ हत्तीडोई शाखेच्या वतीने ओबीसी जनजागरण मेळावा व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  जनजागरण मेळाव्याच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुखदेव लांजेवार रमाकांत पशिने होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून भैय्याजी लांबट, गोपाल सेलोकर, वहिद शेख, नाना बांडेबुचे, जयदेव पडोळे आदी उपस्थित होते. यावेळी गोपाल सेलोकर म्हणाले, ओबीसीची संख्या निश्‍चित नसल्यामुळे प्लॉनिंग कमिशन ओबीसींना वाटप संख्या नुसार करीत नाही. भिकारी जेवढी भिक घेतो तेवढी भीक ओबीसी समाजाला मिळत आहे.सुखदेव लांजेवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांची शिक्षण घेतले पाहिजे, शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही तर ओबीसींना रस्त्यावर येवून संघर्ष केला पाहिजे, रमाकांत पशिने यांनी संघटना ओबीसी समाजांना प्रबोधन करतो. त्यांनी घरी जावून विचार करावा खोटे आहे की खरे आहे यांची जाणीव करावी फक्त प्रबोधन ऐकू नका तर त्यावर विचार मंथन करून ओबीसी बांधवांनों जागे होवून स्वत:ला सिद्ध करा. संचालन जागेश्‍वर पडोळे यांनी केले. आभार ग्रा.पं.सदस्य जयदेव पडोळे यांनी केले. जनजागरण मेळावा स्पर्ध परीक्षा मार्गदर्शन यशस्वी करण्याकरिता मुख्य आयोजक शंबू बांडेबूचे, सुधाकर मोथरकर, रजत कारेमोरे, रूपेश लांजेवार, दिनेश मारबते, आशिष पडोळे, लक्ष्मीकांत भाजीपाले, संदीप ईश्‍वरकर, मंदीश्‍वर भोंगाडे, अविलाल लांजेवार, लक्ष्मीकांत भोंगाडे, पवन सोनवाने यांनी सहकार्य केले.   (नगर प्रतिनिधी)