शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींच्या खर्चानंतरही रस्ता ठरला कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:31 IST

खमारी ते बेलगाव रस्ता यंत्रणांच्या साठगाठीचा बळी ठरला आहे. दोन वर्षांपासून २ कोटींचा निधी मंजूर असताना तो खर्च करून रस्त्याचे बांधकाम पूर्ण केल्यानंतरही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. पावसाळ्या अगोदर सदर रस्त्याचे बीबीएम करण्यात आले. परंतू कारपेट न झाल्याने रस्ता उखडला तर चिखलामुळे वाहनांचे अपघात वाढले आहेत.

ठळक मुद्देखमारी ते बेलगाव रस्ता : बांधकाम विभागाची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : खमारी ते बेलगाव रस्ता यंत्रणांच्या साठगाठीचा बळी ठरला आहे. दोन वर्षांपासून २ कोटींचा निधी मंजूर असताना तो खर्च करून रस्त्याचे बांधकाम पूर्ण केल्यानंतरही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. पावसाळ्या अगोदर सदर रस्त्याचे बीबीएम करण्यात आले. परंतू कारपेट न झाल्याने रस्ता उखडला तर चिखलामुळे वाहनांचे अपघात वाढले आहेत.भिलेवाडा ते मांडवी रस्ता मृत्यूमार्ग म्हणून ओळखला जातो. खोल खड्ड्यांची संख्या तर बांधकाम विभागालाही मोजता येणार नाहीत. ऐवढी आहेत. रस्त्याच हाल बेहाल आहेत. याला रस्ता म्हणावा की चिखलाने माखलेला मृत्यू मार्ग हे आता बांधकाम विभागानेच सांगण्याची गरज आहे. मागील वर्षी या निधीतून खडकी ते ढिवरवाडा ५ कि़मी.चा मार्ग तयार करण्यात आला. मात्र, वर्षभरातच मार्ग अनेक ठिकाणी उखडला आहे. ओरड वाढल्याने यावर्षी पावसाळ्याच्या तोंडावर उर्वरित निधीतून बेलगाव ते खमारी पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम हाती घेण्यात आले. मात्र, कारपेट न करता बीबीएम करून कंत्राटदाराला मोकळे सोडण्यात आले. बीबीएम झालेल्या रस्त्यावर आज अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कडांची पार ऐसीतैसी झाली आहे. परंतू विभागाने बांधकाम पूर्ण करून घेण्याचे धाडस दाखविले नाही. चिखलाने माखलेल्या रस्त्यावर वाहनचालकांना मरणास मोकळे सोडले आहे. यंत्रणांच्या साठगाठीचा परिणाम आज सर्वांना भोगावा लागतो आहे. प्रकरणी वरिष्ठ स्तरावर चौकशी मागणी होत आहे.दोन वर्षापूर्वी मिळाला ३ कोटींचा निधीरस्त्याच्या दुरूस्तीसाठी मागील ५ वर्षापासून ओरड असताना दोन वर्षांपुर्वी भिलेवाडा ते खडकी मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून ३ कोटी रूपये मंजूर झाले. मात्र, रस्त्याचे बांधकाम पूर्ण करून निधी दोन वर्षांतही बांधकाम विभागाला खर्च करता आला नाही. या मार्गावरील वाहतुकदारांचे दुदैव आहे.अनेकांना गमवावा लागला जीवया रस्त्यावर मागील वेळी मंडणगाव येथील दोन सख्या बहिणींना तर बेरोडी जवळ दुचाकीस्वाराला अपघातात जीव गमवावा लागला. गंभीर व किरकोळ जखमी झालेल्यांचे प्रमाण मोठे आहे. या रस्त्याच्या कडा फुटभर खोल आहेत. आडव्या नाल्या व कडेला पाणी साचून राहत असल्याने वाहने कडेला घेता येत नाही. चिखलात वाहन घसरून अपघात होत आहेत.