शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नापेक्षा कापणी-मळणीचा खर्च अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 05:00 IST

भंडारा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. साधारणत: एक लाख ६० हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली. निसर्गाचा मारा झेलत धान बहरला. मात्र ऐन कापणीच्या वेळेस धानावर तुडतुड्याने आक्रमन केले. अख्खे शेत तुडतुड्याने फस्त केले. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात आली नाही. आता सर्वत्र कापणीचा आणि मळणीचा हंगाम सुरू आहे. मात्र उत्पन्नापेक्षा कापणी आणि मळणीचाच खर्च अधिक होत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : चार एकरात पाच ते सहा पोते धान, तुडतुड्याचा प्रकोप, उसणवारी अन् बँकांचे कर्ज फेडायचे कसे

ज्ञानेश्वर मुंदे Ü लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाचा अवकृपेचा सामना करणाऱ्या धान उत्पादकांना यंदा तुडतुड्याने उध्वस्त केले आहे. संपूर्ण शेतशिवार तुडतुड्याने फस्त केले असून आता उत्पन्नापेक्षा कापणी मळणीचाच खर्च अधिक होत आहे. परिणामी काही शेतकऱ्यांनी चक्क उभा धान पेटवून दिला तर काही मोठ्या हिंमतीने धानाची मळणी करताना दिसत आहे. मोहाडी तालुक्यातील काही गावात तर चार एकरात पाच ते सहा पोते धान होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकाराने शेतकरी देशोधडीला लागत आहे.भंडारा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. साधारणत: एक लाख ६० हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली. निसर्गाचा मारा झेलत धान बहरला. मात्र ऐन कापणीच्या वेळेस धानावर तुडतुड्याने आक्रमन केले. अख्खे शेत तुडतुड्याने फस्त केले. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात आली नाही. आता सर्वत्र कापणीचा आणि मळणीचा हंगाम सुरू आहे. मात्र उत्पन्नापेक्षा कापणी आणि मळणीचाच खर्च अधिक होत असल्याचे दिसत आहे. मशागत, बियाणे, रोवणी, फवारणी, कापणी, बांधणी, मळणी यावर साधारणत: २२ हजार रूपये खर्च होतो. २५ ते ३० पोती धान अपेक्षित असतो. मात्र यावर्षी खर्च आणि उत्पन्नाचे गणित जुळताना दिसत नाही. सध्या कापणीसाठी एकरी दोन ते तीन हजार रुपये, बांधणीसाठी १५०० रुपये आणि मळणीसाठी ९० रुपये एकरी खर्च होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातात एकरी पाच ते दहा बोरे पोतेच येत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.मोहाडी तालुक्याला सर्वाधिक तुडतुड्याचा फटका बसला. कापणी आणि मळणीचाही खर्च निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी आता चक्क उभा धान पेटवून दिला आहे. मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथील शेतकरी ईश्वर माटे यांनी चक्क आपल्या अडीच एकर शेतातील धानाला आग लावून दिली. अशीच अवस्था इतरही शेतकऱ्यांची आहे. मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथील शेतकरी बाळकृष्ण पगारवार, देविदास मते, दुर्गाप्रसाद मते, मनोहर निंबार्ते, किशोर सपाटे म्हणाले, तुडतुड्याने आम्हाला उध्वस्त केले आहे. धानातून काही हाती येत नाही. संपूर्ण वर्ष कसे काढावे, असा प्रश्न आहे. आधिच कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावली अशा स्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न आहे. शासनाने तात्काळ तुटतुड्यामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. सध्या तरी कोणत्याच हालचाली दिसत नाही.

चार एकरात पाच पोतेही धान नाहीमोहाडी तालुक्यातील शिवनी येथील शेतकरी युगल सराटे यांचे शेत तुडतुड्याने उध्वस्त केले. आता त्यांच्या शेतात मळणी सुरू आहे. चार एकरात पाच ते सहा पोते धान होण्याचीही शाश्वती नाही, असे युगल सराटे यांनी सांगितले. शेतात केवळ तणस असून धानाची मळणी करावी की नाही, असा प्रश्न माझ्यासोबत अनेक शेतकऱ्यांना पडला असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभर मेहनत करून हाती काहीच उरत नसेल तर जगायचे कसे, असा सवाल आंधळगावचे भोजराम शेंडे यांनी केला.धान उध्वस्त, सांगा जगायचे कसेपिकासाठी शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत घ्यायची, रात्रीचा दिवस करायचा, घाम गाळायचा आणि त्याचे उत्पन्न शेतकऱ्यांना शून्य मिळत असेल तर जगायचे कसे, असा बिकट प्रश्न धान उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी धान पिकाकडे मोठ्या आशेने पाहतात. परंतु निसर्गाची वक्रदृष्टी आणि कीडींच्या आक्रमानाने धान पीक उध्वस्त झाले. धान मळणही करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. एकीकडे आधारभूत धान खरेदी सुरू झाली. परंतु धान अल्प प्रमाणात येत आहे. अनेक शेतकरी आता हा धान रोखीने व्यापाऱ्यांना विकूण दिवाळी सण साजरा करण्याच्या मनस्थितीत दिसत आहे.

निसर्गार्चा प्रकोप कुणी रोखू शकत नाही. यंदा धान पिकाला महापुराचा फटका बसला. यातून शेतकरी सावरत नाही. तोच धानावर तुडतुड्याचे आक्रमण झाले. अनेक शेतकरी हतबल दिसत आहे. मात्र नैसर्गीक संकटाला घाबरून न जाता शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीचा हिम्मतीने सामना करावा. तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आपण अधिवेशनात मांडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.-राजू कारेमोरे, आमदार.

टॅग्स :agricultureशेती