शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
5
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
6
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
7
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
8
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
9
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
10
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
11
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
12
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
13
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
14
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
15
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
16
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
17
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
19
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
20
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

कोल्हापुरी बंधारा दुरूस्तीच्या नावावर निधीची अफरातफर

By admin | Updated: June 10, 2016 00:53 IST

१३ वा वित्त आयोग जिल्हा नाविन्यपुर्ण योजना २०१४-१५ अंतर्गत कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती काम रेंगेपार कोठा हद्दीत वा सिमाक्षेत्रात न करता...

अधिकाऱ्यांची चुप्पी : फलका वरून जनतेत संभ्रम, ग्रामसेवक म्हणतात आरोप बिनबुडाचेलाखनी/सालेभाटा : १३ वा वित्त आयोग जिल्हा नाविन्यपुर्ण योजना २०१४-१५ अंतर्गत कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती काम रेंगेपार कोठा हद्दीत वा सिमाक्षेत्रात न करता दैतमांगलीच्या पुलाजवळ कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती काम पूर्ण केल्याचे दाखवून शासकीय निधीची परस्पर विल्हेवाट लावल्याचा महाप्रताप नरेश शिवनकर सचिव ग्रामपंचायत रेेंगेपार कोठा यांनी केल्याचा प्रकार नुकताच उजेडात आला आहे.लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा ग्रामपंचायतचे विद्यमान सचिव नरेश शिवनकर यांनी १३ व्या वित्त आयोग जिल्हा नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत कोल्हापूरी बंधारा दुरूस्तीचा काम ९ डिसेंबर २०१४ ते २१ डिसेंबर २०१४ या कालावधीत केला. सदरील कामास मंजुरी पत्र कार्यारंभ आदेश सचिव ग्रामपंचायत रेंगेपार कोठा यांना मिळाला. घड्याळी तासाप्रमाणे प्रतिदिन चार तास प्रमाणे १३ दिवसात एकूण ५२ तास केले. कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती कामावर ६,४३, ४८९ रूपये खर्ची करण्यात आले. परंतु कोल्हापूरी बंधारा दुरूस्तीचे काम रेंगेपार कोठा गावाच्या परिसरात, हद्दीत वा सिमाक्षेत्रात दिसतच नाही. सदर कोल्हापूरी बंधारा दुरूस्तीचे काम दैतमांगली गावाजवळील पुलाला लागून असलेल्या भिंतीवरील फलका वरून दिसताच जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती कामाबाबद ग्रामस्थांनी विचारणा केली असता कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती काम वसंतराव पमा काडगाये यांचे शेताजवळ झाल्याचे नरेश शिवनकर सचिव ग्रा.पं. रेंगेपार कोठा यांनी सांगितले. दैतमांगली गावावरून मेंढा-सोमलवाडाकडे जाणारा ३ कि़मी. रस्ता आहे. मेंढा, सोमलवाडा ते दैतमांगली दरम्यान नाला असून नाल्यावर बऱ्याच वर्षापूर्वी पुल बांधलेले आहे. पुलाच्या एका कडेला अंदाजे ५ फुट उंचीची एक भिंत आहे. त्याच जुन्या भिंतीची डागडुजी करून कोल्हापूरी बंधारा दुरूस्तीच्या कामाचे छायाचित्र काढून काम पूर्ण झाल्याचे दाखविण्याचा अनोखा प्रकार सचिव नरेश शिवनकर यांनी केला आहे. डागडुजी केलेल्या भिंतीवर माहिती फलक लिहिलेला आहे. परंतु माहिती फलकावर अंदाजपत्रकीय रक्कम, कामावर झालेली खर्ची रक्कम, कामाचा कालावधी आदी माहिती लिहिलेली नाही. पण कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती काम ग्रा.पं. रेंगेपार कोठा हे विधान लिहिण्यास विसर पडली नाही हे मात्र विशेष.कोल्हापुरी बंधारा दुरूस्ती काम २३ जानेवारीला झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले तर ३० मार्चला धनादेश क्रमांक २११४३ रूपये ५,१८,२६३ च्या धनादेशावर सहायक लेखा अधिकारी ल.पा.जि.प. भंडारा व कार्यकारी अभियंता भंडारा यांच्या स्वाक्षरीने सचिव ग्रा.पं. रेंगेपार कोठा या नावाने देण्यात आलेला आहे. १३ वा वित्त आयोग जिल्हा नाविन्यपूर्ण योजना २०१४-१५ अंतर्गत कोल्हापूरी बंधारा दुरूस्तीची निधी खर्ची करून दैतमांगली गावात काम होतो. रेंगेपार कोठा येथे प्रत्यक्ष काम दिसत नाही हे उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल. कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती कामात लाखो रूपयाची अफरातफर करण्यात संबंधित अधिकाऱ्यांचाही हात असावा, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)