शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
4
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
6
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
7
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
8
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
9
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
10
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
11
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
12
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
13
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
14
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
15
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
16
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
17
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
18
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
19
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
20
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल

कोरोनानंतरचे साइड इफेक्टस वाढले; औषधी काळजीपूर्वक घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात या आजाराची लक्षणे नसलेली रुग्णसंख्या शून्य असली तरी अनेकांना या आजाराबाबत इत्यंभूत माहिती नाही. परिणामी कोरोनानंतरचे साईड इफेक्ट्स वाढले तर औषधी काळजीपूर्वक घ्या, असे आवाहनही वैद्यकीय तज्ज्ञ करीत आहेत.

ज्या रुग्णांमध्ये मधुमेह आहे तसेच आयसीयूमध्ये अधिक काळ उपचार घेत असलेल्यांनी काळजी घेतली नाही तर अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळली आहेत. यात राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये रूग्णही आढळली आहे.

भंडारा जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे अद्यापपर्यंत एकही रुग्णांची नोंद व उपचार सुरू नसल्याची माहिती आहे. म्युकरमायकोसिसपासून संरक्षण करण्यासाठी कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमितपणे तपासावी असे सांगण्यात येते. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मायक्रोबायोलॉजिस्ट, न्युरोलॉजिस्ट, ईएनटी डॉक्टर्स, ऑप्थॅमोलॉजिस्ट, डेंटिस्ट, सर्जन, बायोकेमिस्ट यांच्याशी त्वरित भेटून सल्ला घेणे आवश्यक आहे.

रेमडेसिविरचे साइड इफेक्ट्स

रेमडेसिवीरचा वापर पूर्णपणे प्रभावी असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही, मात्र उपचाराच्या प्रायोगिक पद्धतीनुसार हे इंजेक्शन देण्यात येत आहे. कोरोनारुग्णांच्या उपचारपद्धतीमध्ये या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. संसर्ग झालेल्या पहिल्या दहा दिवसांमध्ये पाच दिवसांसाठी इंजेक्शनचा डोस देण्यात यावा. दहा दिवसांसाठी हा डोस देण्याची गरज नाही. हे इंजेक्शन दिल्यानंतर काही रुग्णांमध्ये उलट्या होणे, हातपाय थरथरणे, जुलाब, चक्कर येण्यासारखे त्रासही दिसून आले आहे.

काय होतात परिणाम

म्युकरमायकोसिस आजार झाल्यास रुग्णांमध्ये नाकबंद होणे, नाकातून काळा किंवा रक्तयुक्त द्रव येणे, गालाचं हाड दुखणे चेहऱ्याच्या एका बाजूने दुखणे, दात दुखणे, दात हलणे व पडणे, जबडा दुखणे, डोळे दुखणे, छाती दुखणे, श्वास घेण्यात त्रास आदी लक्षणे दिसू लागतात. नाकबंद झालेल्या सर्वच रुग्णांना हा आजार झाल्याचं समजू नका. हा आजार बुरशीचा संसर्ग आहे. जे रुग्ण जास्त काळ इतर आजारांचा उपचार घेतात त्यांची वातावरणातील रोगजंतूंशी लढण्याची क्षमता कमी होते. अशावेळी हा संसर्गचा धोका वाढतो.

स्टेरॉइड्सचे साइड इफेक्ट

कोरोना साथीच्या वेळी रुग्णालयात गर्दी होऊ नयेत म्हणून आणि डॉक्टरांकडे लांब पळण्यासाठी लोक सल्लामसलत करून औषध घेतात. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अँटिव्हायरल, स्टेरॉइड्स आणि अँटिबायोटिक्स घेण्यात येत असलते. स्टिरॉइडचा वापर हा ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांमध्ये करू नये. जिल्हा रुग्णालयात असे रूग्ण आले नाहीत. परंतु स्टेरॉइड्सच्या साइड इफेक्ट अंतर्गत औषध खाल्यावर तंद्री, चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे किंवा डोकेदुखीचा त्रास होतो.

कोट बॉक्स

धूळ असलेल्या ठिकाणी किंवा बांधकाम ठिकाणी जात असाल तर मास्कचा वापर करा. हा बुरशीजन्य आजार आहे. स्वच्छता पाळा तसेच अन्य नियमांचे पालन करा. या आजारावरील ‘अम्फोटेरीसीन बी’ हे इंजेक्शन महागडे आहे. परिणामी वेळीच लक्षण ओळखावे.

- डॉ. नितीन तुरस्कर,

अध्यक्ष, आयएमए, भंडारा

काेरोना रुग्णाला म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास याबाबत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी सुचविलेला औषधोपचार करावा. याबाबत संशय आल्यानंतर किंवा तसं स्पष्ट झाल्यानंतर औषधोपचार घेण्यासाठी उशीर करू नका.

- डॉ. निखील डोकरीमारे,

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा