शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसींचे कॉकटेल मानवी शरीरासाठी अपायकारक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:00 IST

लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून प्रत्येक जण आपापल्या परीने लसीकरण करण्यासाठी आतुर झाले आहे. विशेषतः तरुणांमध्ये लसीकरण करण्याबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. पुन्हा एकदा लसीकरण मोहीम सुरू झाल्यास लस घेण्यास अनेक जण पुढे येणार आहे. परंतु पहिला डोस घेतलेली घेतलेली लस दुसऱ्या डोसला हवी, असेही म्हणणारे बहुतांश लोक आहेत.

ठळक मुद्देवैद्यकीय तज्ज्ञांचे मत : तीच लस उपलब्ध नसेल तर अन्य घ्यायला हरकत काय?

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोना महामारीपासून बचाव करायचा असेल तर लस हा एकमात्र व सुरक्षित असा उपाय आहे. मात्र सध्या लसींच्या प्रचंड तुटवड्यामुळे अनेकांना लस मिळत नाही.  यावर आता कोरोना लसीचे कॉकटेल झाले तर मानवी शरीरावर परिणाम होतो काय, याबाबत चर्चा सुरू आहे. शासनाने याबाबत दिशानिर्देश जारी करीत कुठलाही परिणाम मानवी शरीरावर होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञही दुजोरा देत असले तरी काही तज्ज्ञांच्या मते  कॉकटेल न केले तर बरे होईल असाही सूर उमटत आहे. परंतु  नागरिकांनी दोन्ही बाबतीत घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही स्पष्ट केले आहे.लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून प्रत्येक जण आपापल्या परीने लसीकरण करण्यासाठी आतुर झाले आहे. विशेषतः तरुणांमध्ये लसीकरण करण्याबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. पुन्हा एकदा लसीकरण मोहीम सुरू झाल्यास लस घेण्यास अनेक जण पुढे येणार आहे. परंतु पहिला डोस घेतलेली घेतलेली लस दुसऱ्या डोसला हवी, असेही म्हणणारे बहुतांश लोक आहेत.  सूचनेप्रमाणे तसे होत होते; मात्र आता नवीन दिशानिर्देशानुसार आधी कोविशिल्ड व नंतर कोव्हॅक्सिन घेतली तरी मानवी शरीरावर त्याचा कुठलाही परिणाम जाणवत नाही. दोन्ही लसी आपापल्यापरीने मानवी शरीरात अँटिबॉडिज तयार करतात. एकमेकांना कधीही विरोध करीत नसल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पहिली लसनंतर दुसरी अन्य लस घेतली तरी घाबरण्याचे कुठलेही कारण आता राहिले नाही. मात्र त्या प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक झाले आहे.भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत प्रथम व दुसरा डोस मिळून २ लाख ७४ हजार ६४० नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. यात ४५ ते ५९ वयोगटातील प्रथम टप्प्यात अंतर्गत ७७ हजार २१७ नागरिकांनी प्रथम डोस घेतला तर २१ हजार ३२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक अंतर्गत प्रथम डोस ८९ हजार ९३० जणांनी तर दुसरा डोस ४,२४५ नागरिकांनी घेतला आहे. १८ ते ४४ या वयोगटातील फक्त १२,१३६ नागरिकांना हा डोस मिळाला आहे. आताही या वयोगटातील साडेपाच लाखपेक्षा जास्त नागरिक लसीकरणासाठी प्रतीक्षा करीत आहेत. 

पहिला डोज वेगळा अन् दुसरा डोज वेगळाच पहिला डोस कोविशिल्ड व दुसरा डोस कोव्हॅसिन घेतला तरी मानवी शरीरावर कुठलाही विपरीत परिणाम जाणवत नाही, अशी बाब वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. याबाबत शासनाने ही दिशानिर्देश जारी केले आहेत. जर डोस उपलब्ध नसेल तर अन्य लस घेण्यात कुठलीही आपत्ती नाही. 

तज्ज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात?

कोरोना महामारी अंतर्गत लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने लस घेतली पाहिजे. शक्यतोवर तीच लस घेतली तर बरे होईल. लसीचा कॉकटेल झालं तरी विपरीत परिणाम होत नाही. पण तसे करू नये, असे मला वाटते. -डॉ. नितीन तुरस्कर, अध्यक्ष, आयएमए, भंडारा

शक्यतोवर दोन्ही डोस एकच लस घ्यावे. शासनाचे दिशानिर्देश आहेत ते योग्य आहे. अँटिबॉडीज आपल्या स्तरावर परिणाम दर्शवितात. लस दुसरी घेतली तरी घाबरण्याचे कारण नाही उपचारावर विश्वास ठेवा.-डॉ. निखिल डोकरीमारे, जिल्हा रुग्णालय भंडारा. 

विद्यमान स्थितीत कोरोना संकटावर लसीकरण हेच रामबाण उपाय आहे. कोणतीही लस घेतली तर शरीरात अँटिबॉडीज तयार होत असते. अन्य लस घेतली म्हणून विपरीत परिणाम होत नाही. लस कॉकटेल झाली म्हणून घाबरू नका. परंतु लसीकरण करणार नाही, अशी भूमिका घेणे योग्य नाही.- डॉ. मनोज चव्हाण, हृदयरोग तज्ज्ञ भंडारा.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस