शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

जिल्ह्यात 13 हजार नागरिकांना कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित असली तरी प्रशासनाच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अंतर्गत लसीकरणाला जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर मिळून १५ हजार १७० असे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत उद्दिष्टाच्या ८८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, तर जिल्ह्यात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील अति जोखमीच्या आजारी रुग्णांना लसीकरणास प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्दे११३३ ज्येष्ठ नागरिक : ८३४९ आरोग्य कर्मचारी, ६८२१ फ्रंटलाईन वर्कर

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, आतापर्यंत १३ हजार ४०२ नागरिकांनी कोरोनाची लस  घेतली आहे. त्यात ११३३ ज्येष्ठ नागरिकांसह ८३४९ आरोग्य कर्मचारी आणि ६८२१ फ्रंटलाइन वर्करचा समावेश आहे. जिल्ह्याला उद्दिष्टाच्या ८८ टक्के एवढे लसीकरण करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित असली तरी प्रशासनाच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अंतर्गत लसीकरणाला जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर मिळून १५ हजार १७० असे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत उद्दिष्टाच्या ८८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, तर जिल्ह्यात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील अति जोखमीच्या आजारी रुग्णांना लसीकरणास प्रारंभ झाला आहे. ४५ ते ६० वयोगटात ९० व्यक्तींना तर ६० वर्षांवरील १०३४ नागरिकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, लसीकरणात ऑनलाइनचा बाधा येत आहे. लस घेतल्यानंतर कुणालाही त्रास झाल्याच्या तक्रारी मात्र नाहीत.  ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आजार असलेल्या लाभार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून लसीकरण ज्या तालुक्यात करावयाचे आहे त्या तालुक्यातील रुग्णालयात जाऊन लसीकरण करून घ्यावयाचे आहे. ऑनस्पाॅट रजिस्ट्रेशनही करता येणार आहे.

लसीकरणाचे केंद्र भंडारा येथील जिल्हा रुग्णालय, टीबी रुग्णालय, गणेशपूर व परसोडी येथील आरोग्यवर्धीनी केंद्र, तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय, खापा येथील आरोग्यवर्धीनी केंद्र, गोबरवाही व नाकाडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पवनी येथे ग्रामीण रुग्णालय आणि कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, साकोली येथे उपजिल्हा रुग्णालय, लाखांदूर, मोहाडी आणि लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात नि:शुल्क लसीकरण करण्यात येत आहे. तसेच महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत भंडारा येथील पेस हॉस्पिटल, इंद्राक्षी हाॅस्पिटल आणि साकोली येथील पार्वती हॉस्पिटलमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी स्वयंनोंदणी संकेतस्थळावर करणे आवश्यक आहे.

कोरोना लस घेण्यासाठी केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. नागरिकांनी गर्दी न करता वेळेचे नियोजन करून लसीकरणासाठी उपस्थित राहावे. सकाळी ९ ते सायंकाळी ४.४५ वाजेपर्यंत लसीकरणाची वेळ आहे. दुपारच्या वेळी तुलनेत कमी नागरिक येतात. नागरिकांनी गर्दी न करता वेळेचे नियोजन केल्यास लसीकरण सुकर होईल. -संदीप कदम, जिल्हाधिकारी

३०० कोरोना ॲक्टिव्ह रुग्णजिल्ह्यात गत महिन्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०० च्या आत होती. मात्र आता ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, गुरुवारी जिल्ह्यात ३०० ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण भंडारा तालुक्यात १६१ आहेत. दरम्यान, गुरुवारी ४१ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, १५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी ३०० रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात १६१, मोहाडी १७, तुमसर ४८, पवनी २६, लाखनी ३७, साकोली ६ आणि लाखांदूर तालुक्यातील ५ ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी १,५७९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा तालुक्यात ३१, पवनी ४, मोहाडी आणि लाखनी येथील प्रत्येकी २ तर तुमसर आणि साकोली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजार २०५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १३ हजार ८१२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यापैकी १३ हजार १८५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. सध्या मृतांची संख्या ३२७ आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी नागरिक मात्र नियमांचे पालन करताना दिसत नाही. सर्वत्र गर्दी होत असल्याने कोरोना रुग्ण वाढण्याची भीती आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस