शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णसंख्या नीचांकी पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:26 IST

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. दरराेज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत होते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांची ...

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. दरराेज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत होते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांची संख्या घटू लागली. परंतु शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. गुरुवारी जिल्ह्यात ७५८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा १९, साकोली ८, लाखनी १ आणि तुमसर व मोहाडी येथे प्रत्येक दोन असे ३२ रुग्ण आढळून आले. गत दोन महिन्यांत ही नीचांकी पातळी आहे. गुरुवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.२ पर्यंत खाली आला होता.

गुरुवारी तुमसर तालुक्यातील एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर ७२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. सध्या जिल्ह्यात १०२० ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गत काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ८० हजार ९६९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५८ हजार ३७६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ५६ हजार ३०९ व्यक्ती कोरोनामुक्त झाले, तर १०४७ व्यक्तींचा कोरोनाने बळी गेला. आता रुग्णसंख्या वेगाने कमी होत असून मृत्युसंख्याही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळत आहे.

बॉक्स

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटू लागली

जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटू लागल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यात १३ हजारांपर्यंत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या गेली होती. मात्र आता रुग्णसंख्या कमी होऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. जिल्ह्यात सध्या १०२० ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात भंडारा ४०८, मोहाडी ६९, तुमसर ११५, पवनी ७७, लाखनी ८१, साकोली २०५, लाखांदूर ६५ रुग्णांचा समावेश आहे.

बॉक्स

मृत्युदर १.७९ टक्के

जिल्ह्याचा मृत्युदर १.७९ टक्के असून सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात नोंदविले गेले आहेत. भंडारा तालुक्यात ४८८, मोहाडी ९३, तुमसर ११८, पवनी १०४, लाखनी ९४, साकोली १०१, लाखांदूर ४९ अशा १०४७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृत्युदर सुरुवातीपासून नियंत्रणात आहे.