शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे 15 दिवसांत 598 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 05:00 IST

कोरोनाची तिसरी लाट राज्यात आल्यानंतर, भंडारा जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढायला लागली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मात्र, नवीन वर्षाला प्रारंभ होताच हळुहळू रुग्णसंख्या वाढायला लागली. तर, दुसऱ्या आठवड्यापासून अचानक रुग्णसंख्या वाढायला लागली. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाची तिसरी लाट जिल्ह्यात आली असून, अवघ्या पंधरा दिवसांत ५९८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यातही दुसऱ्या आठवड्यात रुग्णांचे प्रमाण वाढले असून शुक्रवारी तर पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शंभरी पार झाला. आरोग्य यंत्रणा सतर्क असली, तरी नागरिक मात्र नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचे दिसत आहे.कोरोनाची तिसरी लाट राज्यात आल्यानंतर, भंडारा जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढायला लागली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मात्र, नवीन वर्षाला प्रारंभ होताच हळुहळू रुग्णसंख्या वाढायला लागली. तर, दुसऱ्या आठवड्यापासून अचानक रुग्णसंख्या वाढायला लागली. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.१ ते १५ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ५९८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी १९२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. सध्या ४०८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासन मिशन मोडवर काम करीत आहे. मात्र, नागरिक आजही नियमांचा फज्जा उडवित असल्याचे चित्र आहे.

१० वर्षाआतील २१ बालके बाधित- कोरोना संक्रमण वाढत असून मुलांना कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ० ते १० वयोगटातील २१ बालकांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यात ११ मुले आणि ११ मुलींचा समावेश आहे. तर, ११ ते २० वयोगटातील ८४ मुलांचा समावेश आहे. त्यात ४३ मुले आणि ४१ मुली आहेत.

सर्वाधिक रुग्ण २१ ते ४० वयोगटातील- दुसऱ्या लाटेप्रमाणे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सर्वाधिक रुग्ण २१ ते ४० वयोगटातील आहेत. २१ ते ३० या वयोगटात १६६ तर ३१ ते ४० या वयोगटात १२० असे २८६ रुग्ण या वयोगटात आहेत. विशेष म्हणजे ७१ ते ८० आणि ८० वरील वयोगटात केवळ १० रुग्ण आहेत. नियमांचे उल्लंघन करीत असल्याने कोरोना संसर्ग वाढत आहे.

जिल्ह्यात ४०८  ॲक्टिव्ह रुग्ण- भंडारा जिल्ह्यात ४०८ ॲक्टिव्ह रुग्ण असून, सर्वाधिक भंडारा तालुक्यात १८२ रुग्ण आहेत. त्याखालोखाल तुमसर ७८, लाखनी ५६, साकोली ३१, लाखांदूर २५ आणि मोहाडीत २३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तिसऱ्या लाटेत कुणाचा मृत्यू झाला नाही. मात्र, तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

शनिवारी ८१ पॉझिटिव्ह - शुक्रवारी ९८९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ८१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. भंडारा तालुक्यात ३२, मोहाडी पाच, तुमसर २७, पवनी तीन, लाखनी चार, साकोली नऊ आणि लाखांदूर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत ६० हजार ७०९ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून, ५९ हजार १६७ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या