शीतगृहाला भेट : जिल्हाधिकारी यांची ग्वाहीलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : येथे बाजारपेठ निर्माण व्हावी, शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांचा माल थेट विक्रीला जावा. शेतकरी संपन्न व्हावा. यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिष्टमंडळाला दिले.बाजार समितीचे संचालक अरविंद कारेमोरे, सुनिल गिरीपुंजे, अनिल जिभकाटे, पचघरे, अनिल भोयर, अवसरे यांनी पंचायत समिती मोहाडी येथे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेतली. मोहाडी येथील निर्मित शीतगृहाला भेट देण्याची विनंती केली. लगेच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मोहाडी येथील शीतगृहाला भेट दिली. शीतगृहाची संपूर्ण पाहणी केली. शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांचा उत्पादीत माल देश, विदेशात पोहचून देणे सहज काम नाही. यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. बाजार समितीच्या सात एकर जागेपैकी एका एकरात शीतगृह तयार केलेले आहे. शीतगृहात माल ठेवण्यासाठी सहा महिने शेतकऱ्यांकडून एक रुपयाही घेतला जाणार नाही. बैलांचा बाजार सुरु केला जाईल. धान खरेदीही केली जाणार आहे. फळ व भाजी यांचा मार्केटयार्ड उभारल्या जाईल. शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव मिळवून देण्याची जबाबदारी घेवू असे अरविंद कारेमोरे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार्य करणार
By admin | Updated: May 11, 2017 00:27 IST