शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या आनंदोत्सवाला पोलिसांचा मज्जाव

By admin | Updated: June 26, 2017 00:25 IST

स्थानिक गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीचा विजयोत्सव साजरा करण्यात येत असतानाच भंडारा शहर पोलिसांनी आतषबाजी करण्यास मज्जाव केला.

प्रकरण कर्जमुक्तीचे : आतषबाजी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्नलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्थानिक गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीचा विजयोत्सव साजरा करण्यात येत असतानाच भंडारा शहर पोलिसांनी आतषबाजी करण्यास मज्जाव केला. यात विजयोत्सव साजरा करण्याची परवानगी नसल्याने पोलिसांनी स्पष्ट केले असले तरी काँग्रेसने या प्रकाराला लोकशाही मुल्यांची अध:पतन असे म्हटले आहे. दुसरीकडे विजयोत्सव साजरा करणारच अशी भूमिका काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात येऊन तनावपूर्ण परिस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर म्हणाले, कर्जमाफी देणे शक्य नाही असे म्हणणा-या सरकारला आज कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला हा शेतकरी एकजुटीचा आणि विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा विजय आहे. काँग्रेस पक्षाने रकमेची अट न घालता सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफीची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाची ही मागणी कायम आहे. तसेच ही कर्जमाफी देशातील आजतागायची सर्वात मोठी कर्जमाफी आहे असे म्हणणे ही राज्यातील जनतेची दिशाभूल आहे. काँग्रेसच्या केंद्र व राज्य सरकारने २००८ साली दिलेली कर्जमाफी अजूनही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी होती, असेही त्यांनी ठासून सांगितले. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकारच्या निर्णयावर गणवीर म्हणाले, काँग्रेस पक्षाने सातत्याने शेतकरी कर्जमाफीचा विषय लावून धरला होता. सरकारने १ लाख ५० हजार रूपयांच्या मयार्देत कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे दीड लाखांपेक्षा जास्त कृषीपूरक कर्ज घेतलेल्या शेतक-यांना या कर्जमाफीचा पूर्ण लाभमिळणार नाही त्यामुळे रकमेची अट न घालता सरसकट सर्व शेतक-यांची कर्ज माफ करावीत ही काँग्रेस पक्षाची मागणी कायम आहे. तसेच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना २५ हजारांची मदत अत्यल्प आहे ती वाढवावी. आता शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतक-यांना तात्काळ बेबाकी प्रमाणपत्र देऊन नविन कर्जवाटप सुरु करावे, शेतक-यांना १० हजार रुपए मदत देताना जशा जाचक अटी घातल्या आहेत तशा अटी घालून शेतक-यांना लाभापासून वंचित ठेवू नये, अशीही मागणी आहे.यावेळी महेंद्र निंबार्ते, धनराज साठवणे, सचिन घनमारे, अनु.जाती. जिल्हाध्यक्ष अजय गडकरी, प्रशांत देशकर, माजी नगरसेवक पृथ्वी तांडेकर, नगरसेविका जयश्री बोरकर, आशा तिवाडे, सुषमा वरगंटीवार, गणेश निमजे, हिरामण लांजेवार, शेख नबाब, जनार्धन निंबार्ते, प्रा मारबते, प्रशांत सरोजकर, विनीत देशपांडे, रवीकुमार येरखेडे, नाहीद परवेज आदी उपस्थित होते.