शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे, खतांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी भंडाऱ्यात कंट्रोल रूम

By युवराज गोमास | Updated: May 18, 2023 18:22 IST

१५ ऑगस्टपर्यंत नियंत्रण कक्ष राहणार आहे.

भंडारा : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बियाणे, खतांचा पुरवठा व निविष्ठांच्या काळाबाजारावर प्रतिबंधासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक आणि फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी थेट कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) मध्ये तक्रार दाखल करावी, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी दिली. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत, त्यांच्या समस्यांचे निराकरण नियंत्रण कक्षात करण्यात येणार आहे.

कंट्रोल रूममध्ये राज्याकडील कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी करतेवेळेस शेतकऱ्यांना विविध अडचणी येतात, या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकिंगबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे.जादा दराने खताची विक्री होत असल्यास बियाणे, खते खरेदीचे बिल मिळत नसल्यास शेतकऱ्यांनी निवारण कक्षात तक्रार नोंदवावी, शेतकऱ्यांनी आपल्या नावासह व संपूर्ण पत्ता, तक्रारीचे स्वरूप यांची माहिती देऊन ९८२३५४७८६१ या डेडिकेटेड नंबरवर तक्रार नोंदवावी. मोबाइल नंबरचा प्रचार, प्रसार संपूर्ण जिल्ह्यात करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी केले आहे.

१५ ऑगस्टपर्यंत राहणार नियंत्रण कक्षनियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) १५ मे ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत दररोज सकाळी १०:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत सुरू राहील. संपर्काचा भ्रमणध्वनी क्रमांक ९८२३५४७८६१ असा असून, हा क्रमांक तक्रार नोंदविण्यासाठी डेडिकेटेड करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना तक्रार करावयाची असल्यास या क्रमांकावर नोंदवावी, त्याची तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येईल, असे कृषी विभागाने कळविले आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा