उन्हाळी शिबिर : छगन राखडे यांचे प्रतिपादनमासळ : आधुनिक युगात मैदानी खेळांकडे पाठ फिरवून मुले तपासन्तास टी.व्ही. बघतात त्याचा विपरित परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यांवर होत असून सतत ३ ते ४ तास टी.व्ही. पाहिल्याने मुलांचा बुद्धयांक कमी होवून एकाग्रता नष्ट होते, असे प्रतिपादन डॉ. छगन राखडे, बालरोग तज्ञ ग्रामीण रुग्णालय पालांदूर यांनी सुबोध विद्यालयात आयोजित उन्हाळी शिबिर कार्यक्रमात केले.आजची मुले ही टी.व्ही. मोबाईलचे आहारी गेलेले आहेत. त्यांची जीवनशैली पुर्णत: बदलत आहे. ही बाब मुलांच्या आरोग्याला हानीकारक आहे. टी.व्ही. मुळे बालगुन्हेगारी, चिडचिडपणा, स्थुलता, चक्कर येणे, थकवा असे अनेक आजारांना मुले बळी पडत आहेत. स्थुलता वाढल्यामुळे अकाली मधुमेह, उच्चरक्तदाब इत्यादी घत्ततक आजार मुलांमध्ये दिसून येत आहेत. डॉ. छगन राखडे यांनी शालेय विद्यार्थी, स्वच्छता व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, शारीरिक व मानसीक आरोग्य टिकविण्यासाठी मुलांचे मन व शरीर सुदृढ ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी प्राणायाम, जॉगिंग, मैदानी खेळ मुलांनी नियमित खेळले पाहिजेत. त्याचबरोबर, संतुलीत आहार घेवून, फास्टफुड, जंकफुड, चायनिज फुड टाळायला पाहिजेत, असेही त्यांनी मार्गदर्शनातून सांगितले. अशाप्रकारच्या अन्नातून अनावश्यक कॅलरिज शरीरात जातात. स्थुलता वाढते. मुलांनी उघड्सावरचे खावू नये, चॉकलेट, तंबाखूजन्य पदार्थ, चहा या गोष्टी मुलांसाठी अपायकारक आहेत. मुलांच्या आहारात, फळे, भाज्या, रताळे, ज्वारी, नाचणी, लिंबुवर्गीय फळे यांचा भरपूर वापर करायला पाहिजे. अंगावर कपडे घालताना सैल, सूती कपडेच घालावे, सूर्यकिरणे आपल्या शरीरावर पडतील यांची काळजी घ्यावी. दररोज दोनवेळा आंघोळ, ब्रश करावे, डोळे, केस यांची काळजी घ्यावी, तंबाखूजन्य पदार्थ, बिडी, सिगारेट यांचे सेवन टाळून मुखरोग, कर्करोग टाळता येवू शकतात. असेही त्यांनी मार्गदर्शन केले. संचालन व्ही.टी. सार्वे यांनी तर आभार प्रदर्शन आर.के. घोनमोडे यांनी केले. (वार्ताहर)
टीव्हीमुळे बालकांवर विपरीत परिणाम
By admin | Updated: April 8, 2015 00:51 IST