शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

'कुबेर'च्या दरबारात 'ठेके'दारांचा ताफा

By admin | Updated: March 29, 2015 00:54 IST

अंगावर पांढरे शुभ्र कपडे... खांद्यावर शुभ्र किंवा भगवा दुप्पटा... हातात महागडे मोबाईल व डोळ्यावर काळा गॉगल लावलेले...

प्रशांत देसाई भंडाराअंगावर पांढरे शुभ्र कपडे... खांद्यावर शुभ्र किंवा भगवा दुप्पटा... हातात महागडे मोबाईल व डोळ्यावर काळा गॉगल लावलेले... रूबाबदार व्यक्ती महागड्या गाडीतून उतरताच परिसरातील सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. पेहराव्यावरून 'ते' मोठे राजकारणी वाटतात. मात्र, ते राजकारणी नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे 'वजनदार' ठेकेदार असल्याने वाताणुकुलीन गाड्यांचा धुराळा उडवीत कार्यालयात येतात.एखाद्या चित्रपटातील अभिनेत्याला लाजवेल अशा रूपाब व पेहरावात येणारे हे व्यक्तीमत्व दुसरे तिसरे कोणी नसुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार आहेत. भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय जिल्हा परिषद कार्यालयाच्या मागील परिसरात आहे. स्वतंत्र इमारतीत असलेल्या या कार्यालयातून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांचे बांधकाम करण्यात येते. कार्यालयाच्या अधिनस्थ अनेक छोटे-मोठे ठेकेदार आहेत. यातील काही शासकीय मान्यताप्राप्त तर काही कमीशनवर काम करणारे ठेकेदार आहेत. ठेकेदारी व्यवसायातून अनेकांनी स्वत:ची समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेकांकडे महागड्या गाड्या आहेत. हे सर्व त्यांनी स्वत:च्या बुध्दीचातूर्यातून कमावले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.मार्च महिन्याचा शेवट सुरू आहे. वित्तीय वर्षाचे शेवटचे दिवस शिल्लक असल्याने वर्षभर केलेल्या बांधकामाचे थांबलेले देयक मिळावे, यासाठी सध्या हे ठेकेदार बांधकाम विभागाच्या कार्यालयात घिरट्या घालीत आहेत. कार्यकारी अभियंता हे या विभागाचे सर्वेवर्वा आहेत. जिल्ह्यातील या विभागाकडे धनलक्ष्मी असल्याने एकप्रकारे 'कुबेर' राजाची उपमा त्यांना याच ठेकेदारांनी दिली आहे. त्यांच्याकडील रखडलेल्या फाईलची देयक मिळावे, यासाठी हे ठेकेदार साकडे घालीत आहेत. वेळप्रसंगी एखाद्या ठेकेदाराला विचारल्यास सार्वजनिक बांधकाम विभागात असल्याचे न सांगता 'कुबेर' राजाच्या दरबारात असल्याचे सांगतो. त्यामुळे आता या विभागाला कुबेरनगरी असे सांबोधल्या जात आहे.वर्षभर किंवा काही दिवसापूर्वी केलेल्या कामांचे देयक मिळावे, यासाठी हे ठेकेदार रखडलेली 'फाईल' साहेबांच्या टेबलवर ठेवण्यासाठी वेळप्रसंगी कर्मचाऱ्यांना प्रलोभण देतात. कार्यालयाच्या दालनात, कोणत्याही व्यक्तीने कार्यालयीन कर्मचाऱ्याजवळ कामाव्यतीरिक्त बसू नये, असे स्पष्ट नमूद असलेला फलक लावलेला आहे. असे असतानाही यातील काही ठेकेदार हे तासण्तास या कार्यालयात लेखा विभागात बसून दिसतात. वर्षभर काळेपिवळे करणाऱ्यांचे देयक आता 'मार्च एंडिंग'च्या सपाट्यात कमिशनच्या बदल्यात काढण्यात येईल, असे ठेकेदारच आता दबक्या आवाजात बोलू लागले आहे. एरवी शासकीय सुट्टीच्या दिवशी हमखास बंद राहत असलेला हा विभाग, आता मार्च एंडिंगच्या नावावर सुरू राहतो. एवढेच नाहीतर रात्री उशिरापर्यंत येथे काम चालते. वर्षभर न होणारे काम, केवळ मार्च एंडिंगच्या नावावर दिवसरात्र मेहनत करून येथील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी करताना दिसून येत आहेत. यावर त्यांच्या कर्तव्यदक्षतेवर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करून नये, हाच त्यांचा मुळ उद्देश असल्याचे यावरून दिसून येते.