शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

खराशी पूल बांधकामात कंत्राटदाराची मनमानी

By admin | Updated: June 18, 2016 00:27 IST

जवळील खराशी पुलाच्या बांधकामामुळे मातीचे योग्य नियोजन न करता शेत शिवारातील बांधासमोरच मातीचे ढिगारे ठेवण्यात आले आहे.

वरिष्ठ अभियंत्याचे वलय : ग्रामस्थांच्या निवेदनाला केराची टोलीपालांदूर : जवळील खराशी पुलाच्या बांधकामामुळे मातीचे योग्य नियोजन न करता शेत शिवारातील बांधासमोरच मातीचे ढिगारे ठेवण्यात आले आहे. परिणामी पाण्याचा प्रवाह वाहून जाण्यााला ब्रेक मिळाल्याने २५-३० शेतकऱ्यांची ६०-७० एकर जमिनीला अडचण निर्माण होत आहे. तसेच रहदारीकरिता असलेल्या रस्त्यावर मातीचे उंच भरण दिल्याने रस्ताच बंद झाला आहे. याविरोधात विचारणा केली असता बांधकामावरील जबाबदार व्यक्ती अरेरावीची भाषा बोलतो. लेखी निवेदनसुद्धा कार्यकारी अभियंत्यांना देऊनही कारवाई शुन्य आहे. बांधकाम करण्यापूर्वी नियोजन महत्वाचे असते. याकरिता कंत्राटदार व अभियंते यांचे बांधकामावर नियमित हजेरी महत्वाची असते. एका अडचणीतून दुसरी अडचण तयार न होता योग्य दिशेने काम होणे महत्वाचे असते. मात्र खराशी पूल बांधकामावर अनियमितता लोकांच्या चर्चेतून चर्चीली जात आहे. लोकप्रतिनिधीच्या कानावर विषय जाऊनही चर्चा शून्य आहे. लोकप्रतिनिधीच कंत्राटदार झाल्याने टक्केवारीत सरशी वाढली आहे. प्रतिनिधीच बोलायला तयार नसताना तर आमची गोची निश्चित आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. खराशी पुलाच्या दोन्ही कडेला नाल्यातीलच माती काढून ढिग रिचविण्यात आले. नंतर जेसीबीच्या सहायाने सपाटीकरण करण्यात आले आहे. खासदार नाना पटोले यांच्या खासदार निधीतून ६.५० टक्क्े रूपये खराशी पुलाच्या बांधकामााठी मिळाले आहेत. भूमिपूजन सोहळ्याला वर्ष लोटला मात्र काम अर्धेही झाले नाही या पावसाळ्यात या रस्त्यावर रहदारीला मोठी अडचण होणार आहे. सर्वात जास्त फटका विद्यार्थी वर्गाला बसणार असून याला जबाबदार पुलाचे मंदगतीने सुरू असलेले बांधकाम राहणार आहे. राजकारणी, लोकप्रतिनिधीचा बेजबाबदार वाढल्याने नियमित वेळेत काम होत नाही याचा फटका सरळ जनतेला भोगावा लागत आहे. खराशी-पालांदूर रस्त्याच्या कडेला दुतर्फा वनराई नटलेली होती. मात्र कंत्राटदारांच्या मनमर्जीने झाडाची कत्तल करीत वनराईला जमीनदोस्त केले. खराशीचे सरपंच पुरूषोत्तम फटे, माजी सरपंच सुभाष ढोके, शेतकरी देविदास बोंद्रे, योगराज झलके, अनंत झलके, मुक्ता झलके, श्रीराम कहालकर, भाष्कर कहालकर, उत्तम झलके, मारोती बोंद्रे, ईश्वर भोयर यांनी प्रत्यक्ष कामावरीच्या व्यक्तींना आपबीती सांगून न ऐकल्याने लेखी निवेदन संबंधित बांधकाम विभागाला देत न्यायाची मागणी केली. न्याय न मिळाल्यास १ जुलैला खराशी-पालांदूर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रभावित शेतकरी योगराज झलके यांनी दिला आहे. (वार्ताहर)