शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

मजुराच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदाराला कारावास

By admin | Updated: December 18, 2014 00:30 IST

मजुराच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या एका ठेकेदाराला पवनी न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

भंडारा : मजुराच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या एका ठेकेदाराला पवनी न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रामकृष्ण मेश्राम रा.आसगाव असे मृत मजुराचे नाव असून गुलाब तुकाराम जिभकाटे रा. आसगाव असे कंत्राटदाराचे नाव आहे.सन २००९ मध्ये आसगाव येथील बाबा ब्राम्हणकर यांच्या शेतातील विहिरीचे बांधकाम सुरू होते. या कामाचे कंत्राट विहिर ठेकेदार गुलाब जिभकाटे यांना दिले होते. जिभकाटे यांंनी विहिरीचे बांधकाम करण्यासाठी रामकृष्ण मेश्राम या मजुराला कामावर ठेवले होते. घटनेच्या दिवशी रामकृष्ण हा कंत्राटदार जिभकाटे यांच्या सांगण्यावरून विहिरीत उतरला. विहिरीत सिमेंटची रिंग भरताना नविन बांधकामाचे रिंग खचले आणि त्यात रामकृष्णचा दबून मृत्यू झाला.मृत रामकृष्णचा साळा अरूण कोसरे यांच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी गुलाब जिभकाटे याच्याविरुद्ध भादंविच्या ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. तपास पूर्ण केल्यानंतर प्रकरण न्यायालयात सादर करण्यात आले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पवनी न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जोशी यांनी निकाल दिला. यात गुलाब जिभकाटे यांनी विहिरीचे बांधकाम करताना योग्य ती काळजी घेतली नाही. त्यामुळे रामकृष्णचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून पवनी न्यायालयाने जिभकाटे याला दोन वर्ष साधा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारकडून विशेष सहायक सरकारी वकील एच.जी. नागदेवे यांंनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अधिकारी पोलीस हवालदार सुभाष मस्के व पोलीस नायक रविंद्र मुंजुमकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)