लोकमत संस्काराचे मोती स्पर्धा : नानाजी जोशी विद्यालय शहापूर येथे रंगतदार सोहळाशहापूर : लोकमत द्वारा आयोजित संस्काराचे मोती उपक्रमात सहभागी स्थानिक नानाजी जोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण मुख्याध्यापक विनोद गोलीवार यांच्या हस्ते करण्यात आले.संस्काराचे मोती उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या उत्स्फू र्त सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांमधून विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रथम कमलेश मोथरकर, द्वितीय क्रमांक श्रुती रामटेके, तृतीय क्रमांक यानी पटकाविला. तसेच अन्य १० विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. त्यामध्ये प्रज्ञा तिरबुडे, श्वेता पिकलमुंडे, प्रणय आकरे, सायली मोहतुरे, प्राजक्ता बोंदरे, यश कांबळे, रुचिका खोब्रागडे, आचल वैद्य, रिया चौहाण, हिमांशु भजनकर यांचा समावेश आहे. याशिवाय याच स्पर्धेत अन्य गटामध्ये नेहा खोब्रागडे, शुभांगी शहारे, हर्षदा बोंद्रे, साक्षी रोडगे व क्षितिज बावणे हे विद्यार्थी विशेष पुरस्काराचे मानकरी ठरले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना लोकमतच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. ग्राम विकास समितीचे कार्यवाह दर्शनलाल मलहोत्रा, मुख्याध्यापक विनोद गोलीवार पर्यवेक्षक बिसेन, निनावे व शिक्षकवृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. (वार्ताहर)
पारितोषिक पटकाविल्यानंतर भारावले स्पर्धक
By admin | Updated: January 26, 2016 00:29 IST