शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुलामुळे तुटतो शेतकऱ्यांचा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:55 IST

भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या नादुरुस्त पूलाचे बांधकाम करण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्यात नाल्यावरील पुलामुळे संपर्क तुटल्यामुळे गोंडउमरी, निलज गावातील शेतकºयांची दोनशे एकर शेती संकटात सापडली आहे.

ठळक मुद्देदोन जिल्ह्याच्या सीमेत अडकले पूलाचे काम : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या नादुरुस्त पूलाचे बांधकाम करण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्यात नाल्यावरील पुलामुळे संपर्क तुटल्यामुळे गोंडउमरी, निलज गावातील शेतकºयांची दोनशे एकर शेती संकटात सापडली आहे.गोंडउमरी, पिपरी ते सौंदड या मार्गावर एक नाला आहे. हा नाला गोंडउमरीला लागून आहे. या नाल्यावर एक लहानपूल असून त्याची दहा वर्षापुर्वी मोडतोड झाली आहे. या क्षतीग्रस्त पूलाची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून शेतकरी करीत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या हद्दीत येणाºया गोंडउमरी व परिसरातील इतर गावात वास्तव्यास असणाºया शेतकºयांची शेती पुलाच्या त्या भागाला म्हणजेच गोंदिया जिल्ह्यात येते. जवळपास २०० एकर शेती असुन खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकºयांना पूल ओलांडून जावे लागते. परंतू पहिल्याच पावसात या पुलाची स्थिती अंत्यत बिकट झाली आहे. नाल्यामुळे पूल पोखरला असून सर्वत्र पाणी साचले आहे. या पुलावरुन बैलबंडी, ट्रॅक्टर अशी वाहने शेतावर नेणे अडचणीचे झाले आहे. मशागत, पेरणी, रोवणी व इतर कामे करण्यासाठी कोणतेही वाहन नेता येत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. प्रसंगी दमदार पावसामुळे नाला ओलाडणाऱ्या शेतकऱ्यांना दुर्घटनेचा बळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधान सडक, मुख्यमंत्री सडक योजना अशा योजनेतून या पुलासाठी राहत निधी उपलब्ध होऊ शकते. मात्र राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती नसल्याने या पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगण्याशिवाय शेतकºयांना उपाय नाही.