शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ गाळातून रस्ते, बाजार व शाळा पटांगणाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 01:02 IST

जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसिंचनाच्या सोयीच निर्माण झाल्या नाहीत तर गावातील मूलभूत सुविधांच्या निर्माणासाठीही हातभार लागला. यातील गाळातून देव्हाडा, पालोरा व करडी गावात खडकाळ शेती उपजावू झाली.

ठळक मुद्दे२०० हेक्टरमध्ये अतिरिक्त सिंचन : करडी, पालोरा, देव्हाडा गावात सुविधांचा विकास

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसिंचनाच्या सोयीच निर्माण झाल्या नाहीत तर गावातील मूलभूत सुविधांच्या निर्माणासाठीही हातभार लागला. यातील गाळातून देव्हाडा, पालोरा व करडी गावात खडकाळ शेती उपजावू झाली. पांदन, रस्ते, घरांच्या जागा तयार झाल्या. देव्हाडा व करडी येथे आठवडी बाजारांच्या जागा तर पालोरा येथे जिल्हा परीषद हायस्कूल व प्राथमिक शाळेचे पटांगण तयार झाले. यामुळे ग्रामपंचायत व शेतकऱ्यांचा श्रम, वेळ व लाखोंचा खर्च वाचला.सन २०१६-१७ मध्ये करडी गावात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून गणपती तलावाचे ‘मॉडेल’ तलावात रुपांतरीत झाले. सुमारे ४० लक्ष रुपयांतून दोनदा गाळाचा उपसा व खोलीकरण करण्यात आले. निघालेल्या सुपिक गाळाचा उपयोग शेतकºयांनी स्वत:च्या साधनाने शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी केला. हजारो टन गाळ खडकाळ जमिनीत ओतून निकृष्ट शेतजमीन उत्कृष्ट केली.करडी ग्रामपंचायतीचे माध्यमातून दर सोमवारला आठवडी बाजार भरविण्याचे ठरविण्यात आले. परंतु बाजाराची निर्धारित जमीन अतिशय खोलगट व चिखल पाण्याने बरबटलेली होती. ग्रामपंचायतीने बाजाराच्या निर्माणासाठी स्वखर्चातून ट्रॅक्टरच्या माध्यमातून गाळाचा भरणा केला.आज तेथे सुविधांनी परिपूर्ण असे सपाट मैदान तयार होवून आठवडी बाजार भरविला जात आहे. सन २०१७-१८ मध्ये पालोरा येथे सुद्धा जलयुक्तच्या गाळातून ग्रामस्थांनी शेतीची सुपिकता वाढविण्याबरोबर घरबांधणीच्या जागा व वाळीच्या जागा उपयुक्त करून घेतल्या. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून जि.प. प्राथमिक व हायस्कुलचे प्रांगणातील खोलगट भागात भरण भरून खेळाचे मैदान तयार करण्यात आले. देव्हाडा बुज ग्रामपंचायतीने बुधवारी भरणाऱ्या गुरांच्या आठवडी बाजाराची व्यवस्था केली. तीन्ही गावातील चिखलाने माखलेल्या पांदन रस्त्यांवर तसेच नाल्यांच्या काठावर मुरुम घालण्यात आल्याने रस्ते शेती उपयोगी ठरले आहेत. तलावाच्या पाळींची दुरुस्ती तसेच कालव्यांची व पाटांची दुरुस्ती यातून करण्यात आली. तसेच शेकडो ग्रामस्थांनी घराचे व परिसराचे भरण भरले आहे.