नागरिकांनी मानले 'लोकमत'चे आभार : ‘लोकमत आपल्या दारी’उपक्रमाची दखलइंद्रपाल कटकवार भंडाराशहरातील राणी लक्ष्मीबाई वॉर्डातील नुतन महाराष्ट्र शाळेच्या मागील भागात रस्त्याची व नाल्यांची समस्या अत्यंत बिकट असल्याचे सर्वंकष वृत्त ‘लोकमत’ने ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत प्रकाशित केले होत. याची दखल घेत नगर पालिका प्रशासनाने मागील आठवड्यात रस्त्याचे बांधकाम सुरू केले आहे. यात विपश्यना केंद्राकडे जाणारा मार्ग गुळगुळीत बनत आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील असलेल्या विपश्यना केंद्रासमोर सुविधांचा बोजवारा असल्याचे वृत्त नागरिकांशी झालेल्या संवाद माध्यमातून ‘लोकमत’ने घडवृन आणला. दोन दशकापासुनची समस्या सांगुनही सुटत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या बिकट रूप धारण करीत असते. नाल्यांची व रस्त्याची समस्या मोठी आहे. विपश्यना केंद्रासमोरील नाली कोणत्या दृष्टीकोणातून बांधण्यात आली, असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला होता. यात संवादातून नगर पालिका प्रशासनाने दखल घेतली. रस्त्याचे बांधकाम सुरू झाले असले तरी नालीचे बांधकामाकडेही लक्ष द्यावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे. नालीच्या अव्यवथेमुळे दुर्गंधी, वाढता डासांचा प्रादुर्भाव, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या दरम्यान रस्त्याचे बांधकाम पुर्णत्वाकडे असून यासाठी नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे. कालव्याची समस्या कायमपेंच प्रकल्पाचे पाणी येण्यासाठी या परिसरातून कालवा गेलेला आहे. वॉर्डातील नाल्यांमधील सांडपाण्याचा प्रवाह या नहरात सोडू नये, असे सांगितल्यानंतरीही कालव्यात सांडपाणी सोडण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. या कालव्याचा व नालीचा उंचसखलपणामुळे याचे घाणयुक्त बॅकवॉटर विपश्यना केंद्रापर्यंत पोहचत असते. नहराला नाला बनविल्यामुळे आरोग्याच्या समस्येत वाढ झालेली आहे.
विपश्यना केंद्रासमोरील रस्त्याचे बांधकाम
By admin | Updated: July 4, 2016 00:33 IST