शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कान्हळगावात मॉडेल ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम

By admin | Updated: January 13, 2016 00:39 IST

कान्हळगाव ग्रामपंचायतीची ईमारत मोडकळीस आली होती. गावकऱ्यांना बसण्यासाठी, दस्तऐवज ठेवण्यासाठी सुध्दा अडचणींचा सामना करावा लागत होता.

जनसुविधेतून मिळाला १२ लाखांचा निधी : ‘नो प्रॉफिट, नो लॉस’ तत्त्वावर बांधकामकरडी (पालोरा) : कान्हळगाव ग्रामपंचायतीची ईमारत मोडकळीस आली होती. गावकऱ्यांना बसण्यासाठी, दस्तऐवज ठेवण्यासाठी सुध्दा अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात परिस्थिती गंभीर असायची. सरपंच व सदस्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे निधीची मागणी केली. परंतू १५ वर्षांपासून प्रश्न सुटत नव्हता. अखेर जनसुविधा योजनेतून १२ लाख रूपयांया निधीला मंजूरी मिळाली. ‘नो लॉस, नो प्रॉफीट’ तत्वावर ग्रामपंचायतीची सुसज्ज व अत्याधुनिक सुविधांनी युक्त मॉडेल ईमारतीचे बांधकाम करुन प्ररेणादायी उदाहरण सर्वांसमोर उभे केले आहे.मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव ग्रामपंचायतीच्या मोडकळीस आलेल्या ईमारतीच्या बांधकामासाठी सरपंच गिता रोडके व उपसरपंच दिगांबर कुकडे आणि सदस्यांनी अनेक योजनांचा अभ्यास केला. त्यामध्ये बीआरजीएफ योजनेचाही समावेश होता. मात्र टप्प्याटप्प्याने निधी मिळत असल्याने योजना पटत नव्हती. ग्रामपंचायतीला त्यांच्या मनातील कल्पना साकार करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी जनसुविधा योजनेची निवड केली. परंतू या योजनेसाठी डिपीडिसीकडे अनेक ग्रामपंचायतीचे अर्ज होते. निधी मंजुरीसाठी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य बाबु ठवकर यांनी पुढाकार घेतला. १२ लाखांच्या निधीत अत्याधुनिक सुविधानीयुक्त सुंदर, आकर्षक व सर्वांच्या मनात भरणारी मॉडेल ईमारत तयार करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अभियंता बोरकर यांना साकडे घातले. मनाप्रमाणे अंदाजपत्रक तयार करवून घेतला.कामाच्या आराखड्यात मनातील कल्पनांना मुर्त रुप देण्यात आले. कामाचे कंत्राट ग्राम पंचायतीने स्वत:कडे ठेवले. नो लॉस, नो प्राफिट तत्वावर बांधकाम करण्यास सुरुवात झाली. कल्पनेप्रमाणे बांधकामासाठी गावातील गवंडी काम करणाऱ्या तरुणाला काम देण्यात आले. अंदाजपत्रकात नमुद नसलेली अनेक कामे उरकुन घेण्यात आली. आतील कामाबरोबर बाहेरिल भागाचे काम आकर्षक पध्दतीने करण्यात आले. त्यातून एक देखनी इमारत आकाराला आली. ग्राम पंचायत इमारतीच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी आमदार चरण वाघमारे यांनी निधी दिला असून बांधकाम सुरु आहे. ग्रामपंचायतीला मिळालेला पर्यावरण रत्न पुरस्काराचा निधी बगीच्याच्या उभारणीसाठी राखून ठेवलेला असून त्यातून बगीच्याची उभारणी होणार असल्यची माहिती आहे. कान्हळगाव हे १२०० लोकवस्तीचे गाव असून ग्रामपंचायतीला हागणदारी मुक्त ग्राम, पर्यावरण रत्न ग्राम, महात्मा गांधी तंटामुक्त गाव, १०० टक्के कर वसुली आदी पुरस्कार मिळालेले असून त्या निधीतून अनेक विकासाची कामे करण्यात आली आहेत. (वार्ताहर)