तुमसर: नगर परिषद तुमसर ही कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहते असाच एक प्रकार येथील प्रभाग क्रमांक ९ मधील दुर्गा नगर व श्रीराम नगर येथील सिमेंट रोड बांधकामा संदर्भात तेथील नगरसेवकांना कसलीही माहिती न देता अंदाजपत्रकाला डावलून जोमाने रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या संदर्भात तेथील नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रार केली असता सदर प्रकार उघडकीस आला आहे.
तुमसर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक ९ दुर्गा व श्रीराम नगर येथिल भोरगडे ते सिंगनजुडे हे सिमेंट रोड चे काम विषेश रस्ता अनुदाना अंतर्गत स्थानिक नगरसेवकांना माहिती न देता तसेच अंदाजपत्रकाला डावलून नियमबाह्यरीत्या कंत्राटदारा मार्फत सिमेंट रस्त्याचे काम अति जलद गतीने सुरू करण्यात आले असता तेथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवका कडे बांधकामाबाबतची तक्रार केली असता, नगर सेवक बोरकर हे स्वतः बांधकाम स्थळी पोहोचले. यावेळी सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने बांधकाम बंद करण्यास सांगितले. तसेच मुख्यधिकारी व बांधकाम अभियंता यांना भ्रमणध्वनी करून सांगितले असता काही वेळ काम बंद करून परत काम सुरू करण्यात आले या बाबत न प गट नेते रगडे यांना माहिती दिली मात्र सिमेंट रस्त्याचे बांधकाम जलद गतीने सुरू असल्याने उलट सुलट चर्चा सुरू प्रभागात सुरू आहेत या न.प. च्या भोंगळ कारभारा बाबत काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तीतीरमारे यांनी दखल घेऊन रस्त्याची वरिष्ठांना तक्रार करून बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.