शहरं
Join us  
Trending Stories
1
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
2
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
3
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
4
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
5
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
6
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
7
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
8
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
9
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
10
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
11
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक
12
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
13
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
14
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
15
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
16
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
17
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
18
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
19
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा

कारली वितरिकेचे बांधकाम अर्धवट

By admin | Updated: June 13, 2016 02:05 IST

तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत कारली येथे सन २००६-१७ या कालावधीत वितरिकेचे बांधकाम सुरु करण्यात आले. मात्र हे बांधकाम मध्यंतरीच रखडले.

पवनारा : तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत कारली येथे सन २००६-१७ या कालावधीत वितरिकेचे बांधकाम सुरु करण्यात आले. मात्र हे बांधकाम मध्यंतरीच रखडले. त्यामुळे परिसरातील कारली, गर्रा, आसलपाणी, मोहगाव, जोगेवाडा, चिचोली, भोंडकी, मोखेटोला येथील शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यामुळे वंचित राहावे लागले. त्यांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.बावनथडी प्रकल्पाचा उजवा कालव्यावरील कारली वितरिकेचे काम सन २००६-०७ कालावधीत सुरु झाले. परंतु बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहचू शकले नाही. या वितरिकेवर गर्रा ३९३.५० एकर, कारली ८३०.५० एकर, आसलपाणी ४५६ एकर, चिचोली १,००२.८७ एकर, भोंडकी ५५१.४० एकर, मोठागाव २०५.९७ एकर, जोगेवाडा १४८.९२ एकर शेतजमीन आहे. शासनाला महसूल पाठविण्याकरिता शेतकऱ्यांचा सिंहाचा वाटा असतो. मात्र पाणी मिळत नाही. याबाबत अनेकदा तक्रार दिली. कुणीही पुढाकार घेतला नाही. प्रशासन किती सुस्त आहे असे म्हणायला हरकत नाही. जंगलव्याप्त भागात वसलेला कारली गावात ९० टक्के आदिवासी बांधव आहेत. शासनाच्या योजना कुचकामी ठरल्या आहेत. येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी न मिळाल्यामुळे दुष्काळामुळे कर्जाचा डोंगर वाढला आहे. याबाबत बावनथडी प्रकल्प सिंचन विभाग व लोकप्रतिनिधी यांना ही बाब अनेकदा लक्षात आणून दिली तरी कुणीही लक्ष दिले नाही. केवळ आश्वासन देण्यात आले. येथील शेतकऱ्याचा मुख्य भात पिक असून यावर्षी देखील पिकाची लागवड करण्यात येईल तरी कारली वितरिकेचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचन व्हावे अशी सर्व शेतकऱ्याची मागणी आहे. (वार्ताहर)