शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो योजनेतील पुलाचे बांधकाम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:17 IST

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : चांदपुर येथील शेतकºयांचे शेत शिवारात पांदन रस्त्याचे विकास कामांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली. पंरतु फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असुन पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. निधी खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.चांदपुर गावात शेतकऱ्यांचे अनुदान राशी ...

ठळक मुद्देपाईप खरेदीवरही खर्च : अन्य कामाचा थांगपत्ता नाही, चांदपूर येथील प्रकार

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : चांदपुर येथील शेतकºयांचे शेत शिवारात पांदन रस्त्याचे विकास कामांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली. पंरतु फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असुन पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. निधी खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.चांदपुर गावात शेतकऱ्यांचे अनुदान राशी वर तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने डल्ला मारले असतांना पुन्हा पांदन रस्त्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गावात सन २०१६ सत्रात डी.पी. ते आंब्याचे झाडपर्यंत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत पांदन रस्त्याचे कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याचे कामे करण्यासाठी ३ लाख ५३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. पांदन रस्त्यावर एका पुलाचे बांधकाम करण्यात आले असले तरी बाळा फडणवीस यांचे शेत शिवार नजिक पुलाचे बांधकाम करतांना फक्त पाईप घालण्यात आले आहे. या पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. पांदन रस्त्याचे प्राप्त निधीची उचल करण्यात आली आहे. यात १ लाख २५ हजार रुपयांचा निधी असुन ५ हजार रुपयाचे मस्टर काढण्यात आले आहे. दरम्यान तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने अर्धवट कार्य ठेवल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.या पांदन रस्त्यावर मुरुमाचा थांगपत्ता नाही. फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याने गावकऱ्यांच्या भुवय्या उंचाविल्या आहे. या गावात शेतकऱ्यांचे योजनांचा बोजवारा वाजविण्यात आला असल्याने न्याय देतांना अडचणी येत आहेत. तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाचा फटका विद्यमान प्रशासनाला बसत आहे. लाभार्थ्यांचे याच प्रशासनावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. ज्या गैरव्यवहारात या प्रशासनाची भुमिका नाही. यामुळे खोट्या आरोपाची जबाबदारी स्विकारण्यात येणार नाही. अशी भुमिका ग्राम पंचायत प्रशासनाने घेतली आहे. यामुळे गावात रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामाची चौकशी करुन दोषी पदाधिकारी तथा कर्मचारी विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे.पांदण रस्त्याचे पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले असून शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. रोहयो योजनेची चौकशी झाली पाहिजे.- उर्मिला लांजे,सरपंच चांदपूर