शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 22:52 IST

कोष्टी हा हलबांचा धंदा असल्याचा इतिहास हाय कोर्टात मान्य झाला. जाती दाखला अन्यायकारक अवैध ठरविल्यानंतर उच्च न्यायालयाने नोकरीला संरक्षित केले, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध भाजपा सरकारने सुप्रीम कोर्टात जाऊन हलबांचा विश्वासघात केला, यामुळे विदर्भात भाजपा सरकार विरोधात आक्रोश वाढत आहे.

ठळक मुद्देनंदा पराते : जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

आॅनलाईन लोकमतभंडारा : कोष्टी हा हलबांचा धंदा असल्याचा इतिहास हाय कोर्टात मान्य झाला. जाती दाखला अन्यायकारक अवैध ठरविल्यानंतर उच्च न्यायालयाने नोकरीला संरक्षित केले, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध भाजपा सरकारने सुप्रीम कोर्टात जाऊन हलबांचा विश्वासघात केला, यामुळे विदर्भात भाजपा सरकार विरोधात आक्रोश वाढत आहे. म्हणून संविधानाचा सन्मान करून भाजपा सरकारने हलबांना न्याय दिला पाहिजे, असे प्रतिपादन आदिमच्या मार्गदर्शिका अ‍ॅड. नंदा पराते यांनी केले.राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या माध्यमाने कर्मचारी व अधिकारी यांचा मेळावा तुमसर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर धकाते होते. मंचावर आदिमच्या मार्गदर्शिका अ‍ॅड. नंदा पराते या उपस्थित होत्या. अतिथी म्हणून धनंजय धापोडकर, ओमप्रकाश पाठराबे, मनोहर हेडाऊ, किरण बारापात्रे, आशिष पात्रे, सौरभ कुंभारे, यादोराव कुंभारे, मोरेश्वर निनावे, महेश लिमजे, किर्ती कुंभारे, अरुणा श्रीपाद, शोभा बुरडे, गीता बोकडे हे होते.अ‍ॅड. नंदा पराते म्हणाल्या संविधानानुसार दलित, आदिवासी, ओबीसी यांना आरक्षण मिळाले होते. तसेच हलबा, हलबी जमातीचा घटना यादीमध्ये समावेश केला आहे. सरकारच्या सक्षम अधिकाऱ्यांनी लाखो जाती दाखले मागासवर्गीयांना दिलेत. संविधान यादीमध्ये जाती, जमातींना आरक्षणाचा लाभ देणे सरकारचे प्रमुख कर्तव्य आहे. संविधान यादीतील हलबा, हलबी जमातींचा हिंदू धर्माच्या नावाखाली आणि कोष्टी धंद्याच्या नावाने अन्याय होऊ देणार नाही, असे भाजपा नेत्यांनी निवडणुकीपूर्वी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा सरकार महाराष्ट्रात सतेत आल्यास तीन महिन्यात जी.आर. काढून हलबा बांधवांना न्याय देऊ असे आश्वासन दिले होते, परंतु जात तपासणी समिती भाजपा सरकारच्या इशाºयावर हलबांचे जाती दाखले खोटे ठरवित आहे. सक्षम अधिकाºयाने निर्गमित केलेले जाती दाखले खोटे कसे असू शकतात, भाजपा नेत्याचा आश्वासनावर विश्वास ठेवून २०-२२ आमदार हलबा बांधवांनी निवडून दिलेत. भाजपा सत्तेवर आल्यानंतर संविधानाचा सन्मान करण्याएवजी हलबांशी विश्वासघात करत आहे. या जनजागृती मेळाव्यात धनंजय धापोडकर यांनी भाजपा सरकारच्या कृती व चर्चा संबंधी म्हणाले आश्वासनाशिवाय ही भाजपा सरकार या जनजागृती मेळाव्यात धनंजय धापोडकर यांनी भाजपा सरकारच्या कृती व चर्चा संबंधी म्हणाले आश्वासनाशिवाय ही भाजपा सरकार कोणत्याही प्रकारे न्याय देण्याची कृती दाखवत नाही, यामुळे सर्व समाजात असंतोष आहे.जाती दाखल्यासाठी १९७६ च्या आधीची पुराव्याची अट असताना सुद्धा त्रास देणे सुरू आहे.या मेळाव्यात आशिष पात्रे व मनोहर हेडाऊ यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर १० एप्रिलला मोर्चा काढत असून या मोर्च्यात सर्व हलबा समाज बांधवांना सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मेळाव्यासाठी महेश लिमजे, प्रकाश कुंभारे, महेंद्र कुंभारे, किर्ती कुंभारे, मीनल लिमजे, मनिषा खेताडे, यमुना निनावे, शोभा निखारे, पल्लवी कुंभारे यांनी सहकार्य केले. शंतनू निखारे यांनी आभार मानले.