शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जैतपूर येथे संविधान बचाव संघर्ष समितीचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:00 IST

लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथील सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात संविधान बचाव संघर्ष समितीचे एक दिवसीय शाखास्तरावरील धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना निवेदन : राज्यघटनेच्या विरोधातील आर्थिक आधारावरील आरक्षण बंद करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथील सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात संविधान बचाव संघर्ष समितीचे एक दिवसीय शाखास्तरावरील धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक प्रा.अनिल कान्हेकर होते. प्रमुख अतिथी प्रा.स्वप्नील वासनिक, सामाजिक कार्यकर्ते शब्बीर पठाण उपस्थित होते. या संविधान बचाव समितीद्वारे पूर्ण देशभरातील ५५० जिल्हास्तरावर ४५०० तालुकास्तरावर व ५०००० ब्लॉक स्तरावर चरणबद्ध पद्धतीने विरोध प्रदर्शन करण्यात आले. केंद्र सरकारने घटनेच्या विरोधात दिलेली १० टक्के आर्थिक आधारावरील आरक्षण बंद करण्यात यावे, ईव्हीएमवरील मतदान बंद करण्यात यावे, ओबीसी जातीनिहाय जणगणना करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रा.अनिल कान्हेकर म्हणाले, केंद्र सरकारने आर्थिक आधारावर दिलेले १० टक्के आरक्षण घटनाबाह्य आहे. या विषयावर सविस्तर माहिती समजावून सांगितली व आरक्षण हे प्रतिनिधीत्व आहे. ते सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणावर दिले जाते. ते पुढे म्हणाले, ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुकीत कसे घोटाळे होतात व लोकशाही कशी धोक्यात आली आहे, या मुद्यांवर माहिती दिली. शब्बीर पठाण यांनी सर्व बहुजन, एससी, एसटी, ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांकांना एकत्रित होण्याचे व या व्यवस्थेविरोधात उभे राहून लढा देण्याचे आवाहन केले.संचालन किशोरदत्त सतीमेश्राम यांनी केले तर भाग्यवान सोनपिंपळे यांनी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.धरणेसाठी नवनीत गराडे, कुणाल ठवरे, कार्तीक वडस्कर, भारतलाल वडस्कर, रेश्मा शेंडे, बुद्धघोष दहिवले, केतकी देव्हारे, वर्षा लंजे, सायली शेंडे, खुशबू मेश्राम, प्रियंका सोनवाने, अश्विनी सोनवाने, युवराज भुरले, धर्मेंद्र मेश्राम,ह र्ष बोरकर, स्वप्नील टेंभुर्णे, आकाश टेंभुर्णे तथा गावकºयांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.स्वप्नील वासनिक यांनी मानले. मागण्यांचे निवेदन अधिकाºयांना सोपविल्यानंतर धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली.