शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटना देशाचा सर्वाेच्च ग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:17 IST

भारताची घटना ही सर्व भारतीयांचा एकमेव सर्वाेच्च ग्रंथ आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे मुंबई खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती व भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती व्ही.एस. देशपांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देन्यायमूर्ती व्ही. एस. देशमुख : राज्यघटना उद्देशिका अनावरण

आॅनलाईन लोकमतभंडारा : भारताची घटना ही सर्व भारतीयांचा एकमेव सर्वाेच्च ग्रंथ आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे मुंबई खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती व भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती व्ही.एस. देशपांडे यांनी व्यक्त केले.भारतीय घटनेची प्रस्तावना, उद्देशिका जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली, त्या अनावरणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वकील संघ भंडाराचे अध्यक्ष अ‍ॅड. कैलास भुरे, बार कॉन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल गोवारदिपे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. व्ही. बी. भोले, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक डी.व्ही. देशमुख, भंडारा जिल्हा वकील संघाचे सचिव अ‍ॅड. राजकुमार उके, जिल्ह्यातील न्यायाशीध, वकील व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.न्या. देशपांडे यांनी, भारतीय घटनेची प्रस्तावना भारतीय नागरिकांना कर्तव्य पालन काय व कसे करावे हे सांगते. त्यातील शब्दांना जिवंतपणा आणण्याचे कर्तव्य आपणा सर्वांचे आहे. उद्देशिका आपणच मुर्तीमंत स्वरूपात कृतीत आणायची आहे. त्यातून पळवाट काढता येणार नाही. हे काम केवळ न्याय संस्थेचे नाही. त्यासाठी स्वत:ला बदलवावे लागेल. स्त्रियांना न्याय वागणूक द्यावी. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी भंडाऱ्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी, राज्यघटना देशाची जीवनवाहीनी आहे. याचे पालकत्व न्यायपालिकेकडे आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण व कायद्याचे राज्य हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य हेतू आहेत. भारताची विविधता म्हणजे संस्कृती, भाषा, वंश, प्रांत, धर्म आणि जाती यांना एकत्र आणण्याच्या हेतुने नमूद केले आहेत. भारतीय घटना ही विषमता नष्ट करणारा केवळ कायदा नसून इतर कायदे करण्याचे अधिकार देणारी यंत्रणा सुद्धा आहे. त्यामध्ये बोलणे, वागणे, विचार व्यक्त करणे इत्यादीचे नागरिकांना मर्यादित स्वातंत्र्य दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.संचालन अ‍ॅड. शशीर वंजारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रबंधक डी.व्ही. देशमुख यांनी मानले.