शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्वेच्छा अनुदानासाठी एकवटले खापरीवासीय

By admin | Updated: April 27, 2016 00:26 IST

पंचायतराज धोरणानुसार ग्रामसभेला महत्व प्राप्त झालेले असून गाव करी ते राव न करी याचा प्रत्यय खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसनासंदर्भात घेण्यात आलेल्या...

७० कुटुंबांनी घेतला निर्णय : विशेष ग्रामसभेत झाला ठरावअशोक पारधी पवनीपंचायतराज धोरणानुसार ग्रामसभेला महत्व प्राप्त झालेले असून गाव करी ते राव न करी याचा प्रत्यय खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसनासंदर्भात घेण्यात आलेल्या ग्रामसभेने दाखवून दिले. स्वेच्छा पुनर्वसनासाठी सभाच घ्यायची नाही अशी भूमिका असताना नागरिकांच्या मागणीनुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ५०० च्या पुढे उपस्थिती असलेल्या विशेष सभेत ७० टक्के कुटुंबांनी स्वेच्छा पुनर्वसनाचे बाजूने तर ३० टक्के कुटुंबांनी गावठाणच्या बाजूने मतदान केले.गोसीखुर्द प्रकल्पामुळे खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसनाचा मुद्दा गेली कित्येक वर्षे नोकरशाहीत अडून राहिला. त्या गावाला पाहिजे तेवढी जमीन प्रकल्पाचा पुनर्वसन विभाग उपलब्ध करून देवू शकला नाही. गोसीखुर्द प्रकल्प व त्याहीपेक्षा जास्त त्रास उमरेड, कऱ्हांडला, पवनी अभयाण्यातील हिंस्त्र प्राण्यांपासून नागरिकांना होवू लागला होता. कित्येक कुटुंबांनी स्वत:चे कुटुंब नाईलाजाने स्थलांतरीत केलेले होते. अशा परिस्थितीत लोकांची मागणी विचारात घेणे गरजेचे होते. त्यामुळे ग्रामसभेशिवाय पर्याय उरलेला नव्हता. अखेर सोमवारला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. कधी नव्हे एवढी उपस्थिती ग्रामसभेला होती. दिवसभर पाच ते सहा तास ग्रामसभा चालली. सुरुवातीला ग्रामसभेचे अध्यक्ष महणून सुनिल श्रीहरी ढोणे यांची आवजी मतदानाने निवड झाल्यानंतर सभा सुरु झाली. खापरी (रेहपाडे) गावाला स्वेच्छा अनुदान की भूखंड या एकमेव विषयावर चर्चा करण्यात आली. ग्रामसभेच्या सदस्यांचे मतदान घेण्यात आले. तेव्हा ७० टक्के लोकांनी स्वेच्छा अनुदान पाहिजे या बाजूने मतदान केले ३० टक्के लोकांनी भूखंड पाहिजे या बाजूने मतदान केले. ७० टक्के व ८० टक्के लोकांनी स्वेच्छा अनुदान की भूखंड पाहिजे ते नमुना अर्ज भरून दोन किंवा तीन दिवसात ग्रामपंचायत कार्यालयाकडे सादर करावे असे ठरावात नमूद करण्यात आले. पवनी तालुक्यात पहिल्यांदाच अशा विषयावर सभा घेण्यात आल्याने बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक मधुकर गीते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व अन्य सदस्य सुद्धा उपस्थित होते. ग्रामसेवक काटेखाये यांनी विशेष ग्रामसभेचा ठराव वाचून दाखविला व सभेचा समारोप झाला.