शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताच्या अतिवापराने जमिनीच्या पोतावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 21:55 IST

जलदगतीने उत्पादन घेण्यासाठी शेतशिवारात रासायनिक खतांचा अधिक उपयोग करण्यात येत असल्याने जमिनीत असणारी जैविकता नष्ट होत आहे. याचे दुष्परिणाम शेतकरी अनुभवत आहेत. यामुळे विषमुक्त शेतीकरिता सेंद्रिय शेती करायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसंजय देशमुख : सिहोरा येथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : जलदगतीने उत्पादन घेण्यासाठी शेतशिवारात रासायनिक खतांचा अधिक उपयोग करण्यात येत असल्याने जमिनीत असणारी जैविकता नष्ट होत आहे. याचे दुष्परिणाम शेतकरी अनुभवत आहेत. यामुळे विषमुक्त शेतीकरिता सेंद्रिय शेती करायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.सिहोरा येथील बाजार चौक परिसरात आयोजित कायदेविषयक, सेंद्रीय शेती, रासायनिक खत आणि दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश न्या. संजय देशमुख होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव कोठारी, डॉ. संजय एकापुरे (गणेशपूर), अ‍ॅड. प्रशांत मेश्राम, रडार शेतकरी उत्पादकचे संचालक अभय ठेंगे, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, वाहनी येथील सरपंच गडीराम बांडेबुचे, केंद्रीय नोटरी अ‍ॅड. विजय पारधी, पेसेज कॅरिअर बेस्ट डील कंपनीचे संचालक गौरीशंकर डोहके, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक ओमकार तुरकर, शेखर तिवारी, संतोष गाढवे, जयशंकर घटारे, कलीम शेख, चंद्रशेखर डोहळे, राकेश मिश्रा, नरेश ढोमणे उपस्थित होते.सिहोरा परिसरातील ४७ गावात असणाऱ्या शेतकऱ्यांना जैविक आणि सेंद्रिय शेतीमुळे विषयी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या शिवाय शेतकऱ्यांना कायदेविषयक ज्ञान असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.शिबिराचे आयोजन करण्यात आले असता शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. या मेळाव्यात शेतकऱ्यांना रासायनिक खतामुळे जमिनीतील पोत आणि जैविक घटक नष्ठ होत असल्याची माहिती देण्यात आली.यामुळे उत्पादनात निरंतर घट होत आहे. याशिवाय शेतीवर दुष्परिणाम होत असल्याचे उपस्थित असलेल्या मार्गदर्शक अतिथींनी यावेळी आर्वजून सांगितले. दरवर्षी सातत्याने शेती उत्पादनात घट अनुभवणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व अनुमती तज्ज्ञांना सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जयशंकर घटारे यांनी केले.