‘मापिसा’ कायद्याचा विरोध : पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थितीतुमसर : राज्य शासनाने प्रस्तावित केलेला नवीन कायदा प्रोटेक्शन आॅफ इंटरनल सेक्युरिटी अॅक्ट २०१६ (मापिसा) हा अन्यायकारी, जुल्मी व हुकुमशाही पद्धतीचा आहे. सर्वसामान्य नागरिकांना भयभीत करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शासनाने चालविला असून त्या निर्णयाविरोधात तुमसर काँग्रेसचा निषेध मोर्चा शनिवारला तहसील कार्यालयावर धडकला.मापिसा कायद्याअंतर्गत १०० किंवा त्यापेक्षा जास्त जनसमुदाय असलेल्या कार्यक्रमासाठी पोलीस परवानगी घेणे, ज्या ठिकाणी १०० लोकांपेक्षा जास्त लोकांची ये जा आहे त्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. लावणे, पोलिसांविरुद्ध टीका न करणे, परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची झडती घेण्याचे अधिकार पोलिसांना दिले गेले. जनआंदोलनादरम्यान गुन्हे दाखल करणे आदी सर्व बाबींचा समावेश आहे. परिणामी या कायद्याअंतर्गत सर्वसामान्यांवर अन्याय करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे संविधान विरोधी आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात काँग्रेसने निषेध मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडकले. निदर्शने करून मापिया कायदा मागे घ्यावे याकरिता तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव प्रमोद तितीरमारे, महिला जिल्हाध्यक्षा सीमा भुरे, कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, तालुका अध्यक्ष शंकर राऊत, शहर अध्यक्ष अमर रगडे, किशोर भवसागर, खेमराज पंचबुद्धे, कुसुम कांबळे, राजेश ठाकुर, निरज गौर, नलिनी डिंकवार, डॉ.मधुकर लांजे, अनिल भांडके, शैलेश पडोळे, विजय गिरीपुंजे, दिलीप चोपकर, आनंद बिसने, भूषण येळणे, समीर कुरैशी, मनोहर बिसने, रमेश पडोळे, योगीता बावनकर, गळीराम बांडेबुचे, रामेश्वर मोटघरे, गुरुदेव पारधी, नागदेव कांबळे, गणेश ठाकुर, अरविंद जोशी, राजेश चोपकर, वेदांता गंगभोज, लता मालाधरे, राजश्री मलेवार, ममता वासनिक, नैनश्री येरणे, प्रतिभा गजभिये, अंकुश बनकर, अजिम पठाण, संजय शरणागत, चैनलाल पटले व काँग्रेस सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
काँग्रेसचा निषेध मोर्चा
By admin | Updated: September 6, 2016 00:29 IST