शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा पायदळ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:18 IST

पुंडलिक हिवसे ।आॅनलाईन लोकमतखरबी (नाका) : भाजप सरकारने मागील निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. धान, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी हा संकटात सापडला आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे लहान व्यापारी व शेतकरी अडचणीत आला आहे. जाचक अटी लादून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवण्याचे महापाप या सरकारने केले. हे सरकार शेतकऱ्यांसाठी मारक ...

ठळक मुद्देमाणिकराव ठाकरे : केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी मारक

पुंडलिक हिवसे ।आॅनलाईन लोकमतखरबी (नाका) : भाजप सरकारने मागील निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. धान, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी हा संकटात सापडला आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे लहान व्यापारी व शेतकरी अडचणीत आला आहे. जाचक अटी लादून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवण्याचे महापाप या सरकारने केले. हे सरकार शेतकऱ्यांसाठी मारक असल्याचा आरोप विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केला.शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी खरबी ते नागपूर असा माजी आमदार सेवक वाघाये पाटील यांच्या नेतृत्त्वात जनआक्रोश पायदळ मोर्चा खरबी येथून काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रफुल गुडधेपाटील, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, जि.प.अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी, महासचिव झिया पटेल, सरोज सेवक वाघाये, सभापती विनायक बुरडे, अ‍ॅड.शशीर वंजारी मंचावर उपस्थित होते.यावेळी प्रफुल गुडधे पाटील म्हणाले, भंडारा जिल्हा हा सधन जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु मागील दोन वर्षात या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे या सरकारला आता खाली खेचण्याशिवाय पर्याय नाही.यावेळी मोर्चाचे आयोजक सेवक वाघाये म्हणाले, माझ्या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. माझ्याकडे ५० एकर शेती असून पाण्याअभावी व तुडतुड्या, करपामुळे खंडीभर धान झाले नाही. ५० एकरातील धान पेटवून टाकले. माझ्यावर असा आघात झाला असेल तर माझ्या शेतकऱ्यांची परिस्थिती कशी असेल ही जाणीव झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी लढा देण्याचे ठरविले व आज विधानभवनावर पायदळ मोर्चा काढत असल्याचे सांगितले.भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सहभागी असलेला हा मोर्चा दुपारी २ वाजता नागपूरच्या दिशेने कूच केला. सायंकाळी ६ वाजता वडोदा येथे विश्रांतीनंतर मंगळवारला सकाळी ६ वाजता ही पदयात्रा नागपूररकडे निघणार आहे. सभेचे संचालन झिया पटेल व राजकपूर राऊत यांनी तर आयोजन जि.प. सदस्य प्रेम वनवे व खराडीचे सरपंच संजय हिवसे यांनी केले. या मोर्चात जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, तालुका अध्यक्ष, नगरसेवक भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.या आहेत मोर्चेकऱ्यांच्या मागण्यानैसर्गिक आपत्तीमुळे धानपीक नष्ट झालेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात यावे. त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, जाचक अटी शिथिल करून सरसकट पीक विमा देण्यात यावा, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा. ओबीसीची नॉनक्रिमीलेअरची अट रद्द करण्यात यावी. विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात यावी. कृषीपंपाचे वाढीव बिल कमी करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, धानाचे दर वाढवून दिले पाहिजे. तुडतुडा व किडीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे. शेतकºयांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी विधानभवनावर हा पायदळ मोर्चा आहे.- माणिकराव ठाकरे,उपसभापती, विधान परिषद.