काँग्रेसची निदर्शने : भंडारा शहरात महिलांसाठी जिल्हा रुग्णालय तातडीने बांधण्यात यावे आणि शहरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या मागणीला घेऊन शहर अध्यक्ष सचिन घनमारे व तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत हे आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाताना माजी आमदार अॅड.आनंदराव वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष जिया पटेल, कार्यकारी जिल्हाध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, प्रमोद तितीरमारे, नगरसेवक शमीम शेख, इमरान पटेल, प्रसन्न चकोले, अभिजीत वंजारी, अजय गडकरी, नितीन बागडे यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
काँग्रेसची निदर्शने :
By admin | Updated: September 8, 2016 00:31 IST