प्रकरण नॅशनल हेरॉल्डचे : त्रिमूर्ती चौकात धरणेभंडारा : केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सतत त्रास दिला जात आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध राजकीय सूड घेण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार कट रचित आहे. परिणामी आज भंडारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाविरुद्ध तीव्र निषेध म्हणून येथील त्रिमूर्ती चौकात धरणे देण्यात आले. प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे भाजप सत्तारुढ झाल्यापासून देशात संविधान व कायद्याचे दोन भागात विभाजन झाले आहे. एक कायदा भाजप मंत्रीमंडळासाठी व दुसरा कायदा काँग्रेस व इतर पक्षांकरिता लागू केला जात आहे. भारताच्या संविधानाचीही थट्टा केली जात आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात हेतूपूर्वक व राजकीय सूड घेण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर हेरॉल्ड प्रकरणी कट रचला जात आहे. ही तानाशाही काँग्रेस सहन करणार नाही, असा खणखणीत इशाराही देण्यात आला आहे. राजकीय सूड घेणाऱ्या केंद्र सरकारच्या या नीतीविरुद्ध भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे धरणे व निदर्शने देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार आनंदराव वंजारी, अनिल बावनकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, सभापती विनायक बुरडे, नीळकंठ टेकाम, नीळकंठ कायते, प्यारेलाल वाघमारे, ज्ञानेश्वर रहांगडाले, कल्पना भिवगडे, स्वाती लिमजे, प्रेमसागर गणवीर, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, मनोहर सिंगनजुडे, सचिन घनमारे, माणिकराव ब्राह्मणकर, राजकपूर राऊत, होमेश्वर महावाडे, नंदू समरीत, सुनील गिऱ्हेपुंजे, अजय गडकरी, रुपलता जांभुळकर, रेखा वासनिक यासह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काँग्रेसतर्फे केंद्राचा निषेध
By admin | Updated: December 20, 2015 00:21 IST