शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस करणार कर्जमाफीचे वर्षश्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:25 IST

मागीलवर्षी २८ जून रोजी राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या योजनेला वर्ष होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही.

ठळक मुद्देनाना पटोले : यवतमाळ येथून २८ जूनपासून आंदोलनाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागीलवर्षी २८ जून रोजी राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या योजनेला वर्ष होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे कर्जमाफी योजनेचा वर्षश्राद्ध करण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी आंदोलनाला प्रारंभ करण्यात येत आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत दिली.यावेळी पटोले म्हणाले, सरकारच्या कर्जमाफी योजनेचे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि सरकारला धारेवर धरण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाची रूपरेखा आखली आहे. याची सुरुवात यवतमाळ येथून गुरूवारपासून होत आहे. १ जुलै रोजी अकोला, २ जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील शहापूर असे येत्या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यात शेतकरी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.मागील चार वर्षाच्या कार्यकाळात जिथे दुष्काळ पडला तिथे मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. परंतु शेतकऱ्यांना मदत दिली नाही. त्या शेतकºयांना सरसकट मदत देण्याची गरज आहे. राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची तारीख ३० जूनपर्यंत वाढविली असून हे सरकार समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या शेतकºयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे.पत्रपरिषदेत जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती प्रेमदास वनवे, जि.प. सदस्य आकाश कोरे, माजी सदस्य रमेश पारधी, भरत खंडाईत उपस्थित होते.पीकविमा ऐच्छिक असला पाहिजेशेतकऱ्यांकडून विम्याची रक्कम सक्तीने वसूली करू नका. सक्तीच्या पिकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यामुळे पीकविमा योजना ऐच्छिक असला पाहिजे ही आमची मागणी राहणार आहे. आणीबाणीत कारागृहात गेलेल्यांना स्वातंत्र्य संग्राम सैनिकांप्रमाणे १० हजार रूपये पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जगाचा पोशिंदा आमचा शेतकरी हा खरा देशभक्त असून या शेतकºयांना वृद्धापकाळात १० हजार रूपये पेन्शन देण्याची खरी गरज असल्याचे पटोले यांनी सांगितले.