भंडारा : केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे़ ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारच्या नियोजनशुन्य सरकार मुळे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात महागाईने कळस गाठला आहे. भाजप सरकार ‘अच्छे दिन’ येणार असे दिवास्वप्न दाखवून देशवासियांची दिशाभूल केली, असा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने निदर्शने केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात घरगुती वीज दरवाढ रद्द करणे, कृषी पंपाचे भारनियमन रद्द करून २४ तास वीज पुरवठा देणे, उन्हाळी धान खरेदीचे चुकारे व्याजासह देणे, वनहक्कधारकांना वनजमिनीचे पट्टे देणे ‘पेरणी ते मळणी’ रोहयोमधून करणे, ६० वर्षावरील शेतकऱ्यांना ५ हजार रूपये दरमहा पेन्शन देणे, निराधार योजनेअंतर्गत दोन हजार रूपये पेन्शन देणे, प्रदूषित वैनगंगा नदी स्वच्छ करणे या मागण्यांचा समावेश होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर धरणे देऊन रस्ता अडविण्यात आला. आंदोलनादरम्यान विद्यूत बिलांची होळी करण्यात आली़ यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, माजी आमदार सेवक वाघाये, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रफुल्ल गुडधे, जिया पटेल, मुजीब पठाण, प्रमिला कुटे, प्रमोद तितीरमारे, मधुकर लिचडे, बशीर पटेल, सिमा भुरे, डॉ़ ब्रम्हानंद करंजेकर, सचिन घनमारे, अनिक जमा पटेल, अजय गडकरी, डॉ़ विनोद भोयर, विनायक बुरडे, नीळकंठ टेकाम, प्यारेलाल वाघमारे, भुषण टेंभुर्णे, मुकूंद साखरकर, राजकपूर राऊत, माणिक ब्राम्हणकर, शंकर राऊत, प्रभू मोहतुरे, सुनिल गिऱ्हेपुंजे, नंदु समरीत, मनोहर महावाडे, अमर रगडे, मनोहर उरकुडकर, नीळकंठ कायते, प्रेम वनवे, राजकुमार मेश्राम, एस़ एस़ आकरे, इमरान पटेल, मनोज बागडे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
कॉंग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल
By admin | Updated: July 22, 2016 00:45 IST