शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे आंदोलन

By admin | Updated: January 10, 2017 00:36 IST

नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. केंद्र सरकारच्या नोटाबंदी विरोधात आज भंडारा शहर महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने थाळीनाद आंदोलन करुन निदर्शने दिली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त : काही काळ वाहतूक विस्कळीत, आंदोलनकर्त्यांनी दिल्या सरकारविरुद्ध घोषणाथाळीनाद मोर्चा भंडारा : नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. केंद्र सरकारच्या नोटाबंदी विरोधात आज भंडारा शहर महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने थाळीनाद आंदोलन करुन निदर्शने दिली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेण्यात आलेल्या या आंदोलनात महिला काँग्रेस कमेटीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनाचे नेतृत्व भंडारा जिल्हा निरीक्षक ज्योती झोळ, महिला जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, भंडारा शहर अध्यक्ष भावना शेंडे, जिल्हा कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणविर यांनी केले. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस यांच्या निर्देशानुसार राज्यभरात थाळीनाद आंदोलन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भंडारा येथे हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने ५०० व १००० रुपयांचा नोटा बंद केल्या. त्यामुळे सर्वसामान्यांना नोटबंदीचा फटका बसला आहे. बँकांमध्ये रक्कम असतानाही ती मिळविण्यासाठी नागरिकांना बँकामध्ये खेटा घालाव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांसमोर अन्न, वस्त्र व निवाऱ्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.शनिवारीला काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी पोलीस व आंदोलनकर्ते यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तिच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून आंदोलनकारी महिला त्रिमुर्ती चौकात पोहचताच पोलिसांनी त्यांना गराडा घातला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी जि. प. सदस्य रेखा वासनिक, प्यारेलाल वाघमारे, निलकंठ कायते, सुनिता टेंभुर्णे, ताराबाई नागपुरे, छाया पटले, जयश्री बोरकर, मिरा उरकुडकर, ज्योती चिंधालोरे, गिता बोकडे, सुनिता कापगते, पुष्पा साठवणे, सुनिता सोरते, वैशाली भवसागर, सुरेखा शहारे, प्रणाली ठाकरे, सचिन घनमारे, मुकूंद साखरकर, शुभम साठवणे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)नोटाबंदीवरून निदर्शनेभंडारा : नोटाबंदीमुळे शेतकरी, शेतमजूर, असंघटीत कामगारांसह सर्वसामान्यांना आर्थिक त्रास होत आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन निदर्शने केली. त्रिमुर्ती चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, कृषी व पशु संवर्धन सभापती नरेश डहारे, डॉ. निंबार्ते, नगराध्यक्ष बाबु बागडे, महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, अभिषेक कारेमोरे, कैलाश नशिने, भगवान बावनकर आदींनी केले.चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यापूर्वी केंद्र सरकारने त्याचे योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबना होत आहे. हंगामात पेरणीसाठी बि-बियाणे व खते खरेदीकरिता बँकामधून पैसे मिळत नसल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. रोखीचे व्यवहारात अडचण निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने नोटबंदीमुळे अडचणीत ढकलले आहे. याचा आंदोलनातून निषेध नोंदविला. यावेळी जि.प. सदस्य ज्योती खवस, नगरसेविका शोभा गोरशेट्टीवार, सुनिल साखरकर, पं.स. सदस्य राजेश मेश्राम, शुभांगी रहांगडाले, डॉ. रविंद्र वानखेडे, विनयमोहन पशिने, महेंद्र गडकरी, नरेंद्र झंझाड, विजय पारधी, नितीन तुमाने, देवचंद ठाकरे, ईश्वर कळंबे, रामरतन वैरागडे, भागिरथ थोटे, धनंजय सपकाळ, सुभाष वाघमारे, उत्तम कळपाते, गजानन बादशाह, हितेश सेलोकर, विजय खेडीकर, मोनु गोस्वामी, बंटी वैद्य, सुभाष तितीरमारे, संजय सतदेवे, शिशुपाल गौपाले आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)साखळी उपोषणभंडारा : जिल्हाधिकारी कार्यालय, पालिका प्रशासनाने शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. या कारवाईत शेकडो कुटूंबांचा संसार उध्वस्त झाला. यात अन्यायग्रस्तांचे पुनर्वसन करुन त्यांना २० हजार रुपये महिना मानधन द्यावे या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख सुर्यकांत इलमे, फुटपाथ सेना जिल्हाध्यक्ष अख्तर बेग मिर्झा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमुर्ती चौकात सुरु करण्यात आले. १५ दिवसांपुर्वी राष्ट्रीय महामार्ग तथा शहरातील अंतर्गत मार्गावरील फुटपाथवर असलेल्या दुकानांचे पालिका प्रशासनाच्या माध्यमातून अतिक्रमण काढण्यात आले. यात अनेकांचे साहित्य पालिका प्रशासनाने जप्त केले. मागील अनेक वर्षांपासून फुटपाथवर व्यवसाय थाटून संसाराचा गाढा चालविणाऱ्या या व्यवसायीकांवर आता उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे या व्यवसायीकांना प्रशासनाने स्थायी रोजगार देवून पुनर्वसन करावे अन्यथा प्रत्येकांना २० हजार रुपये महिना द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच फुटपाथवरील अतिक्रमण हटाव प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही सुर्यकांत इलमे यांनी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलनात पुरुषोत्तम खापेकर, गणेश धकाते, गणेश बारापात्रे, महेंद्रसिंग गहेरवार, देवदास करवाडे, मुकेश थोटे, संदीप सार्वे, जयंत बोदकुले, प्रेमदास धारगावे, लोकेश रंगारी यांच्यासह शहरातील अतिक्रमणात हटविलेले शेकडो व्यवसायीकांचा यात समावेश आहे.प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा सुर्यकांत इलमे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)