शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने मुस्लीम समाजाला प्रवाहापासून दूर ठेवले

By admin | Updated: July 26, 2016 00:48 IST

काँग्रेस पक्षाने मागील ६५ वर्ष देशात राज्य केले. मुस्लीम बांधकांचे एक गठ्ठा मतदान पदरात पाडून घेण्यासाठी...

जमाल सिद्दीकी यांचे प्रतिपादन : मुस्लीम बांधवांनी भाजपात प्रवेश करण्याचे आवाहनभंडारा : काँग्रेस पक्षाने मागील ६५ वर्ष देशात राज्य केले. मुस्लीम बांधकांचे एक गठ्ठा मतदान पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसने मुस्लीम बांधवांना भारतीय जनसंघ, भारतीय जनता पक्ष यांचे भय दाखवून मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले. परंतु मुस्लीम समाजाला हे कळून चुकले आहे की, भाजपच्या मुख्य प्रवाहात सामील झाले तरच कौमची प्रगती आहे. त्यामुळे अधिकाधिक मुस्लीम बांधवांनी भाजपमध्ये प्रवेश घेवून कौमचे भवितव्य घडवावे, असे प्रतिपादन भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केले.भंडारा येथील मुस्लीम लायब्ररी सांस्कृतिक सभागृहात शहर भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे वतीने शनिवारी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार रामचंद्र अवसरे, कलाम शेख, आबीद सिद्दिकी, भंडारा भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी, शमीमा शेख, महेजबीन खान, अजीज शेख, कलीम खान, डिम्मू शेख, फुरकान पटेल, चंदू रोकडे, सुनिल मेंढे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी हाजी नाझीर पटेल यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश घेतला. यावेळी सिद्दीकी यांनी, शिक्षणापासून दूर राहिल्याने मुस्लीम समाज मागे राहिला. छोटेमोठे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे अनेक कर्तबगार तरूण समाजात आहे. मात्र, त्यांच्याजवळ प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र नसल्याने आर्थिक परिस्थिती हलाकिची आहे. मुद्रा लोणच्या माध्यमातून केंद्र सरकारने छोट्या उद्योगात काम करणाऱ्या तरूणांसाठी उद्योजक होण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. भाजपमध्ये मुस्लीम समाज बांधवांचा प्रवेश म्हणजे आगामी नगरपालिकेवर भाजपच्या यशाची नांदी आहे. यासोबतच समाजातील एका विशिष्ट गटाने एका पतसंस्थेच्या नावावर कोट्यवधींचा अपहार केला. याची चौकशी होवून दोषींवर फौजदारी कारवाई करून गरिबांची ठेव परत करण्यास सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन सिद्दीकी यांनी यावेळी केले. याप्रसंगी तारिक कुरेशी, कलाम शेख, आमदार अवसरे यांनी मार्गदर्शन केले. आभार डिम्मू शेख यांनी मानले. कार्यक्रमाला मुस्लीम समाजबांधवांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)