शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने पाळला ‘काळा दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:42 IST

गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही.

ठळक मुद्देनिदर्शने करून केला निषेध : नोटबंदीत मृत्युमुखी पडलेल्यांना वाहिली श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही. सर्वसामान्यांनी कर रूपाने दिलेले साडे सहा लाख कोटी रूपये उद्योगपतींना वाटले, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केला.निश्चलनीकरणाच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त ८ नोव्हेंबर हा दिवस काँग्रेसने ‘काळा दिवस’ म्हणून पाळला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भंडारा येथील त्रिमूर्ती चौकात काळ्या फिती लावून काँग्रेसने निदर्शने केली.पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदीची घोषणा करीत ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे देशभरात महिनाभर चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सामान्यांचे हाल झाले होते. नोटबंदीच्या उद्योगधंदे ठप्प पडले. पैसे असूनही बँकेतून पैसा काढता येत नसल्याने लग्नकार्य अडले. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात जीवन जगणे महाग झाले असून केवळ मरण स्वस्त झाले, अशी टीका प्रदेश सचिव प्रमिला कुटे यांनी केली.यावेळी नोटबंदीच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. निदर्शने कार्यक्रमाचे संचालन महेंद्र निंबार्ते यांनी तर आभारप्रदर्शन सीमा भुरे यांनी केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, अनीक जमा पटेल, धनराज साठवणे, अजय गडकरी, अमर रगडे, राजकपूर राऊत, मनोहर उरकुडकर, आशिष पात्रे, स्वाती लिमजे, रमेश डोंगरे, भूमेश्वर महावाडे, सुनील गिº्हेपुंजे, शंकर राऊत, प्यारेलाल वाघमारे, प्रशांत देशकर, गणेश निमजे, जाबीर मालाधारी, नीळकंठ टेकाम, जनार्धन निंबार्ते, शंकर तेलमासरे, माणिकराव ब्राह्मणकर, मंगेश हुमणे व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, जिल्हा, तालुका, शहर, बुथ कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य, एनएसयूआय, महिला काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.