शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
6
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
7
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
8
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
9
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
10
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
13
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
14
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
15
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
16
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
17
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
18
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
19
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
20
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे

काँग्रेसने शेतकऱ्यांना खाईत लोटले

By admin | Updated: June 28, 2015 00:43 IST

स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात काँग्रेसचेच सरकार होते. या ६० वर्षात काँग्रेसने गोरगरीब जनतेला, शेतकरी व शेतमजुरांना काहीही दिले नाही.

सेंदुरवाफा येथे प्रचारसभा : नितीन गडकरी यांची घणाघाती टीका साकोली : स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात काँग्रेसचेच सरकार होते. या ६० वर्षात काँग्रेसने गोरगरीब जनतेला, शेतकरी व शेतमजुरांना काहीही दिले नाही. ६० वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारी, पक्षाला कंटाळून आत्महत्याच केली. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने ६० वर्षात काही न करता एका वर्षाच्या भाजप सरकावर टीका करीत आहेत. त्यामुळे साठ वर्षात तुम्ही काय केले, ते आधी सांगा नंतर आम्हाला विचारा, असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सेंदूरवाफा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मंचावर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, उपेंद्र कोठेकर, डॉ.प्रकाश मालगावे, डॉ.उल्हास फडके, तारीक कुरैशी, शिवराम गिऱ्हेपुंजे, सभापती नारायण वरठे, तालुका अध्यक्ष शंकर राऊत, वामनराव बेदरे, माजी सभापती रेखा भाजीपाले, महिला तालुका अध्यक्ष इंद्रायणी कापगते, बंडू बोरकर, नेपाल रंगारी उपस्थित होते.यावेळी ना.गडकरी म्हणाले, देशात काँग्रेस सत्तेत असेपर्यंत देशातील दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने, शाळांची अवस्था दयनीय होती. यापूर्वीच्या भाजपच्या कार्यकाळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १.७० लाख गावांना पक्के रस्ते तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात तयार करण्यात आले. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात जलमार्ग विकसीत करण्यात येणार आहे. यापासून रोजगार निर्मिती होणार आहे. जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत १६ कोटी लोकांनी बँकेत खाते उघडून या योजनेचा लाभ घेतला आहे. यावर्षी लाखनी, साकोली व सौंदड येथून उड्डान पुलाचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. जाहीर सभेचे संचालन माजी सभापती गीता कापगते यांनी केले. कार्यक्रमाला किशोर पोगडे, नितीन खेडीकर, मंदार खेडीकर, ललीत खराबे, भिमावती पटले यांच्यासह भाजपचे महामंत्री भरत खंडाईत, डॉ.उल्हास बुराडे, सत्यवान हुकरे, बबलु निंबेकर, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवारांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)तुमसरातील धान घोटाळ्याची चौकशी होणारकाँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात भंडारा जिल्ह्यात घोटाळेच घोटाळे झाले. तुमसर येथे कोट्यवधीचा झालेल्या धान घोटाळ्याची आता लवकरच एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. विरोधी पक्षातील लोक भाजपावर आरोप करून धानाच्या पेंड्या जाळणारे व पदयात्रा काढणारे आता कुठे गेले? असा सवाल करीत आहेत. त्यांना एवढेच सांगायचे की, नाना पटोले पूर्वीही शेतकऱ्यांच्या पाठिशी होते व आताही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहेत. शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही खासदार नाना पटोले यांनी यावेळी दिली.