शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदी विरोधात काँग्रेसने रोखला महामार्ग

By admin | Updated: January 8, 2017 00:24 IST

केंद्र सरकारने चलनातून अचानक ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्या. त्यामुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडला आहे.

टमाटर रस्त्यावर फेकून केला निषेध : १३० कार्यकर्त्यांना अटक, पोलिसांचा बळाचा वापरभंडारा : केंद्र सरकारने चलनातून अचानक ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्या. त्यामुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने भाजीपालाधार्जनीचे उत्पादन कवडीमोल भावात विकावे लागत आहे. यात काँग्रेसने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात आज भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून महामार्ग मोकळा केला. दरम्यान पोलिसांनी काँग्रेसच्या १३० कार्यकर्त्यांना अटकेची कारवाई केली.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तैसर अहमद, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण यांच्या नेतृत्त्वात जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, जि.प. सभापती नीळकंठ टेकाम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सिमा भुरे, प्रमोद तितीरमारे, धनराज साठवणे यांच्या मार्गदर्शनात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेण्यात आला. नोटबंदीमुळे देशातील जनतेला झळ सोसावी लागत आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वसामान्यांविरोधातील या निर्णयाच्या निषेधार्थ भंडारा येथे काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने टमाटर सह अन्य पालेभाज्या कवडीमोल भावाने नाईलाजाने विकावे लागत आहे. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर टमाटर फेकून केंद्र व राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबली. अचानकपणे घेतलेल्या या पवित्र्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांगा लागल्या. वाहतूक रोखून धरत काँग्रेसने घोषणाबाजी सुरू करताच भंडारा शहरचे ठाणेदार जयवंत चव्हाण यांनी पोलीस बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना सुरूवातीला असे न करण्याचे सुचविले. मात्र, ठाणेदारांचे न एैकता कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. वाहतूक विस्कळीत झाल्याने ठाणेदारांच्या सुचनेनुसार पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करून ताब्यात घेतले. यात १३० कार्यकर्त्यांना अटक करून सायंकाळी सोडण्यात आले. पोलिसांच्या पवित्र्याने वाहतूक काही काळासाठी थांबलेली वाहतूक पूर्ववत सुरू झाली. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, नीळकंठ कायते, प्रेम वनवे, भूषण टेंभुर्णे, शुभम साठवणे, नगरसेवक जयश्री बोरकर, मुकुंद साखरकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)मोर्चेकऱ्यांवर नामुष्की काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. यात काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. पहिल्या वाहनात कोंबून सर्व नेत्यांना अटक करून सुरूक्षित ठिकाणी नेण्यात आले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची जबाबदारी महेंद्र निंबार्ते व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सिमा भुरे यांनी स्वत:कडे घेतली. दरम्यान पोलिसांनी दुसरे वाहन आल्यानंतर निंबार्ते व सिमा भुरे यांना अटक केली. यामुळे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे कुणी नसल्यामुळे उर्वरीत आंदोलकांनी मोर्चा स्थळावरून काढता पाय घेतला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन न देताच आंदोलन संपवावे लागण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवल्याचा कदाचित हा पहिलाच प्रसंग असावा.