शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा पालकमंत्र्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:23 IST

गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपांना अत्यल्प वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांचे नेतृत्वात पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या समस्या सोडवा : १८ तास वीज पुरवठ्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

लोकमत न्युज नेटवर्कभंडारा : गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपांना अत्यल्प वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांचे नेतृत्वात पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात आला.शेतकऱ्यांच्या वाढत्या समस्या लक्षात असताना केवळ कोरडे आश्वासन दिले जात आहे, असा आरोप करून नाना पटोले यांनी पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचे आवाहन केले होेते. त्या अनषंगाने सोमवारला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पालकमंत्र्यांना घेराव करून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. राज्याचे ऊर्जामंत्री म्हणून शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्याचे आश्वासन दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना आठ तासापेक्षा कमी वीज पुरवठा होत आहे. कृषीपंपावर आधारीत शेतकरी संकटात सापडला आहे. आश्वासनाची पुर्तता करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २४ तास सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करण्यात येईल, असा सज्जड दम देण्यात आला. ना. बावनकुळे यांनी बुधवारपासून ३१ आॅक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास व रात्रीला सहा तास वीज पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनाची पुर्तता न झाल्यास जिल्ह्यातील प्रवेशावर बंदी आणावी असे आश्वासन पालकमंत्र्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रशांत पवार, जिल्हा परिषद सभापती प्रेम वनवे, रेखा वासनिक, अमर रगडे, डॉ. पंकज कारेमोरे, प्रदीप बुराडे, मुकूंद साखरकर, कमलाकर निखाडे, प्रशांत देशकर आदी उपस्थित होते.