अध्यक्षस्थानी बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक अरविंद कारेमोरे होते. यावेळी समितीचे ज्येष्ठ व्यापारी वसंतराव बालपांडे, गजानन अग्रवाल, भास्कर ढेंगे, अशोक रोकडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक समितीचे अडते अनिल निखाडे यांनी केले. कार्यक्रमात समितीचे मनोज असाटी, गजानन अग्रवाल, सुनील अग्रवाल, आदित्य अग्रवाल, रामभाऊ तलमले, श्रावण मस्के, रामप्रसाद बघेले, सुरेश चकोले, संजय मेश्राम, संजय लाड्से, राजू भुरे, सुनील बालपांडे, देवदास बघेले, रविशंकर तुमसरे, प्रकाश मंत्री, सचिन हात झाडे, वासुदेव संग्रामे, गणेश पोटभरे, अनिल पटले, भोजराज चौरीवार, अनिल पटले, संतोष पटले, हेमंत गायधने व समितीचे सर्व घटक उपस्थित होते.
भारतीय उद्योग व्यापार मंडळावर नियुक्त झाल्याबाबत सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:39 IST