शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

१० प्रकल्पांत ठणठणाट

By admin | Updated: April 11, 2017 00:34 IST

वाढत्या उन्हाच्या दाहकेतेसोबतच पाण्याची टंचाईही निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

भीषण पाणीटंचाईचे संकेत : उपाययोजनांवर भर देण्याची गरजइंद्रपाल कटकवार भंडारावाढत्या उन्हाच्या दाहकेतेसोबतच पाण्याची टंचाईही निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. जिल्ह्यातील दहा प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांपैकी २७ प्रकल्पांमध्ये २५ टक्यांपेक्षा कमीे जलसाठा आहे. बेटेकर बोथली व सोरणा या दोन्ही मध्यम प्रकल्पात शुन्य टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभाग (राज्य) अंतर्गत एकूण ६३ प्रकल्प आहेत. यामध्ये ४ मध्यम, ३१ लघु तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. यात दोन मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांतर्गत कवलेवाडा, पवनारखारी, टांगा, हिवरा, आमगाव, डोडमाझरी तर जुने मालगुजारी तलावांतर्गत केसलवाडा, डोंगरगाव, ऐलकाझरी, जांभोरा, कोका तलावांमध्ये शुन्य टक्के जलसाठा शिल्लक आहे.मध्यम प्रकल्पांतर्गत चांदपूर जलाशयात १४.९२ टक्के व बघेडा जलाशयात ३० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. याशिवाय लघु प्रकल्पांतर्गत कुरमडा, आंबागड, परसवाडा, कार्ली, मंडनगाव, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली अंबाडी, कातुर्ली, शिवनीबांध, कुंभली, सालेबर्डी, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, खुर्शीपार तर जुने मालगुजारी तलावांतर्गत एकोडी, चांदोरी, वलमाझरी, पिंडकेपार, सावरबंध, खंडाळा, चान्ना, लोभी, दिघोरी, दहेगाव व झरी तलावात २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. एकूण जुने मालगुजारी २८ तलावांमध्ये फक्त २६.७३ जलसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा जलसाठा जास्त असला तरी उन्हाळ्याची तीव्रता पाहून हा आकडा कमी वाटतो. ३१ लघु प्रकल्पात १७.९० टक्के जलसाठा असून दोन मध्यम प्रकल्पातील पाण्याची टक्केवारी १३.२५ इतकी आहे.पाणीटंचाईचे संकटजिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याने व उन्हाळ्याची तीव्रता पाहून येणाऱ्या दिवसात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होईल यात दुमत नाही. पाणीपुरवठा योजनेअंतर्गत व आराखड्यानुसार संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना सुरू असल्या तरी तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रयत्न होत आहे.