शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘सोंड्याटोला’चे ८० लाख रूपयांचे विद्युत देयक थकीत

By admin | Updated: June 3, 2017 00:17 IST

सिहोरा परिसरात असणाऱ्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पकडे वीज वितरण कंपनीचे ८० लाखांचे विजेचे देयक थकीत आहे.

प्रकल्प स्थळी अंधारच अंधार : शभर टक्के देयकाची सक्ती केव्हा होणार?रंजीत चिचखेडे । लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात असणाऱ्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पकडे वीज वितरण कंपनीचे ८० लाखांचे विजेचे देयक थकीत आहे. यामुळे महावितरण कंपनीमार्फत मीटर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. परिणामी प्रकल्प स्थळी अंधार पसरला आहे. पावसाळा तोंडावर असल्याने महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षात या प्रकल्पाने बावनथडी नदी पात्रातून चांदपूर जलाशयात पाण्याचा उपसा केला होता. यामुळे यंदा खरिप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले आहे. विज देयकाच्या थकबाकीवरुन महत्वाकांक्षी प्रकल्पाचे हस्तांतरण झाले नाही. प्रकल्पाने उपसा केलेल्या पाण्याची विल्हेवाट आणि वाटप लघु पाटबंधारे विभागाची यंत्रणा करित आहे. शेतकऱ्यांकडून पाणी पट्टी कराची वसुली याच विभागाच्या खांद्यावर जबाबदारी आहे. परंतु विजेचे देयक भरण्याची जबाबदारी आणि नियोजन या विभागाच्या नियंत्रणात नाही. यामुळे प्रकल्प स्थळात पाण्याचा उपसा करतांना दरवर्षी राज्य शासनाला मदतीसाठी याचना करावी लागत आहे. आॅगस्ट महिन्यात प्रकल्प स्थळात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असतांना विद्युत देयकांचे नियोजन पाटबंधारे विभागापुढे नाही. याशिवाय शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला नाही. दरम्यान गेल्या वर्षात थकीत विजेचे देयक टप्याने करण्याचा करारनामा विदर्भ पाटबंधारे विभाग आणि विज वितरण कपंनी यांच्यात झाला होता. गेल्या वर्षात प्रकल्प स्थळात पाण्याची उपसा करण्यात आला असता ८० लाखाचे विद्युत देयकांची थकबाकी आहे. या देयकाच्या वसुलीकरिता प्रकल्प स्थळात नोटीस बजाविण्यात आली आहे. परंतु वितरण कंपनीला समाधानकारक उत्तर प्राप्त झाले नाही. कोट्यावधीच्या प्रकल्प स्थळात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान, प्रकल्पाची अंधारात सुरक्षा अडचणीत आली आहे. महिन्यात पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे. अद्यापपर्यंत प्रकल्प स्थळात मशिन तथा पंपगृहाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली नाही. पाण्याचा उपसा करण्यासाठी प्रकल्प सज्ज नाही. यामुळे यंदा प्रकल्प पाण्याचा उपसा करणार किंवा नाही अशी शंका निर्माण झाली आहे. विद्युत देयकांची थकबाकी शंभर टक्के भरल्यास प्रकल्पची वीज जोडणी पुर्ववत केली जाणार असल्याचा अल्टीमेटम वीज वितरण कंपनीने दिला आहे. राजकीय इच्छा शक्ती अभावी या प्रकल्पाला कायम स्वरुपी आधार मिळाला नाही. वारंवार मायबाप सरकारला प्रकल्प सुरु आणि जिवंत ठेवण्यासाठी आर्थिक मदतीकरिता अजीजी करावी लागत आहे. या प्रकल्प स्थळाचे हस्तांतरण करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय टाकीतील गाळ काढण्याचा नियोजन तयार करण्यात आलेला नाही. गेल्यावर्षी गाळ काढण्यात आली होती. परंतु यंदा प्रकल्प स्थळात स्मशान शांतता पसरली आहे. अद्यापपर्यंत प्रकल्प स्थळात यंत्रणा पोहचली नाही. अशी माहिती मिळाली विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे.जलाशय रिकामा होणारयंदा चुल्हाड शिवारात उन्हाळी धान पिकाला पाणी वाटप करण्यात आले. ६०० हेक्टरहून अधिक शेती ओलीताखाली आणण्यात आली आहे. यामुळे उन्हाळ्यात शिल्लक ठेवण्यात येणारे पाणी रिकामे करण्यात आले आहे. जलाशयात पाण्याचा ठणठणाट आहे. खरीप हंगामाकरिता जलाशयात पाण्याचा उपसा करण्याची गरज आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे विजेचे थकीत देयकासाठी पत्र प्राप्त झाले नाही. जलाशयातील पाण्याचे वाटप आणि पाणीपट्टी कराची वसुली लक्ष पाटबंधारे विभाग करीत आहे.- एन. जे. मिरत, शाखा अभियंता पाटबंधारे विभाग सिहोरासोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे हस्तांतरण झाले नाही. त्यामुळे प्रकल्पातील समस्या निकाली काढतांना अजीजी करावी लागत आहे. कायम स्वरुपी समस्या निकाली काढण्यासाठी पुढाकाराची गरज आहे.- मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ सिंदपुरी