शहरं
Join us  
Trending Stories
1
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
2
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
3
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
4
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
5
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
6
प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."
7
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
8
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
9
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
10
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
12
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
13
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
15
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
16
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
17
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
18
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
19
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
20
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी

महिलेची पतीविरूद्ध पोलिसांत तक्रार

By admin | Updated: September 23, 2016 00:46 IST

एका परप्रांतीय तरूणीशी लग्न करून स्वगृही आणले. तिला शारीरिक व मानसिक त्रास देवून जीवे मारण्याची धमकी दिली.

दीड वर्षाची मुलगी पतीकडे : दहा दिवसानंतरही तपास सुरूचतुमसर : एका परप्रांतीय तरूणीशी लग्न करून स्वगृही आणले. तिला शारीरिक व मानसिक त्रास देवून जीवे मारण्याची धमकी दिली. दीड वर्षीय मुलीला स्वत:जवळ ठेवून घेतले. ती तरूणी देव्हाडी येथील महिला अल्पावास केंद्रात मुक्कामी आहे. पतीवर गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तरूणीने एका एनजीओची मदत घेतली आहे. पोलिसांचा तपास येथे संथगतीने सुरू आहे.सन २०१३ मध्ये कुणाल रहांगडाले (२५) रा. डोंगरी बु. हा बेंगलोर येथे सेक्युरीटी गार्ड म्हणून कार्यरत होता. तिथे त्याचा एका तरूणीशी परिचय झाला. नंतर त्यांनी लग्न केले. सदर तरूणी एका कॉल सेंटरमध्ये कार्यरत होती. सन २०१५ मध्ये दोघेही परत आले. त्यानंतर पती व घरच्यांनी महिलेला त्रास देणे सुरू केले. ही महिला अल्पसंख्यांक समाजाचीआहे. शारीरिक व मानसिक त्रास देणे, जिवे मारण्याची धमकी देणे आदी प्रकार सुरू होते. या प्रकरणात ही महिला एकदा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.दरम्यान या महिलेला एक दीड वर्षाची मुलगी आहे. सध्या ती पतीजवळ आहे. माझ्या मुलीला परत आणून द्या, असा टाहो तिने फोडला आहे. काहीच होत नाही म्हणून १२ सप्टेंबर रोजी पती विरोधात गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. गोबरवाही पोलिसांनी भादंवी ४९८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. सध्या गोबरवाही पोलीस तपास करीत आहे. सदर महिलेने सुकरमासेवा फाऊंडेशन तुमसर या एनजीओची मदत घेतली. तिला देव्हाडी येथील महिला अल्पावास गृहात ठेवण्यात आले आहे. सुकरमासेवा फाऊंडेशनचे संदीप शुक्ला, सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई बावनकर, सविता मदनकर यांनी मदतीचा हात दिला आहे. तुमसर पोलीस ठाण्यातील महिला समुदेशन केंद्रात ही याबाबत कळविण्यात आले आहे.गुरूवारी पिडीत महिला एनजीओ पदाधिकाऱ्यांसोबत पुन्हा सायंकाळी चार वाजता तुमसर पोलीस ठाण्यात पतीसोबत झालेल्या संभाषणाची फित घेवून गेली होती. परंतु त्यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविण्यास सांगितले. परप्रांतात मी एकटी महिलाकाय करू असे या महिलेची व्यथा आहे. शुक्रवारी पुन्हा गोबरवाही पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार नोंदविण्यात येईल, असे सुकरमासेवा फाऊंडेशनचे संदीप शुक्ला यांनी लोकमतला सांगितले. महिलेच्या प्रकरणाबद्दल येथे पोलिसांनी गंभीर होवून कारवाई करण्याची गरज आहे. मागील दहा दिवसापासून तपास सुरूच आहे. (तालुका प्रतिनिधी )संबंधित व्यक्तीविरोधात ४९८ तथा ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नियमानुसार कारवाई करण्यात येईल.-किशोर झोटींग, सहायक पोलीस निरीक्षक गोबरवाही.या प्रकरणाची सविस्तर माहिती संबंधित गोबरवाही पोलीस ठाण्यातून घ्या, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.-विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर.