शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खोटे आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:18 IST

सिंचनाच्या पाण्यासाठी आम्ही आंदोलन केले तर गुन्हे दाखल करता. मात्र अधिकारी लेखी आश्वासन देवूनही पाणी सोडत नाही, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, असे म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी वरठी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार दाखल केली. आता पोलीस कोणती भुमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : पाणी सोडण्याचे आश्वासनाचा विसर, आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे, अधिकाºयांवर का नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सिंचनाच्या पाण्यासाठी आम्ही आंदोलन केले तर गुन्हे दाखल करता. मात्र अधिकारी लेखी आश्वासन देवूनही पाणी सोडत नाही, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, असे म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी वरठी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार दाखल केली. आता पोलीस कोणती भुमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.गत महिन्याभरापासून पावसाने दडी मारली. शेतकरी संकटात सापडला आहे. प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडा, अशी मागणी शेतकरी करीत आहे. मात्र प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर येवुन आंदोलन करीत आहेत. अशा आंदोलक शेतकऱ्यांवर प्रशासन तात्काळ गुन्हे दाखल करते. मात्र प्रकल्प अधिकारी व तहसीलदार आंदोलनाच्या ठिकाणी लेखी आश्वासन देतात. जिल्हाधिकारी पाणी सोडण्याची घोषणा करतात. पंरतु दहा दिवसानंतरही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. खोटे आश्वासन देणाºयांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत कमलेश कनोजे, आनंद मलेवार, राजेश लेंडे यांनी वरठी ठाण्यात तक्रार दाखल केली.लघु वितरिकेच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वरठी, एकलारी, पाचगाव, मोहगाव, बोथली, पांजरा, सोनुली, नेरी या भागात पाणीच मिळाले नाही. महिन्याभरापासून शेतकरी पाण्याची मागणी करीत आहे. पाऊस नसल्याने चार हजार हेक्टरमधील धानपीक हातचे गेले आहे. प्रकल्प अधिकारी व जिल्हा प्रशानाचे ठिसाळ नियोजन शेतकºयांना संकटाच्या घाईत उभे करीत आहे. अशा स्थितीत १ आॅक्टोबर रोजी वरठी येथील पाचगाव फाट्यावर आंदोलन केले. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, प्रकल्प अधिकाºयांनी ५ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. पण पाणी सोडले नाही उलट आंदोलकावर गुन्हे दाखल केले. आता शेतकºयांवर गुन्हे दाखल होत असेल तर अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल का करु नये, असा सवाल शेतकºयांनी केला आहे. वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यावेळी बोथलीचे माजी सरपंच कैलास तितीरमारे, मोहगाव माजी सरपंच राजेश लेंडे, ज्ञानीराम साखरवाडे, दिनकर लांबट, अनिल काळे आदी उपस्थित होते. पोलिसांनी प्रकरण तुर्तास चौकशीत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.एका पाण्याने हातचे गेले पीकमहिन्याभरापासून पावसाने दडी मारली. एका पाण्याने धानपिक हातचे गेले आहे. मोहाडी तालुक्यातील शेकडो हेक्टर धानपीक उध्दवस्त होत आहे. दुसरीकडे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी असून हे पाणी नदीतून वाहत आहे. मात्र कालव्याद्वारे शेतकऱ्याच्या शेतात सोडले जात नाही. प्रकल्प अधिकाऱ्याच्या चुकीच्या धोरणामुळे पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एकीकडे प्रशासन शेतकऱ्यांना पाणी सोडण्याचे आश्वासन देते. मात्र शेतापर्यंत पाणीच पोहचत नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. आंदोलन करुनही पाणी सुटत नसल्याने आता नेमकी कोणती भुमिका घ्यावी अशा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. आता पाणी सोडले तरी उत्पादनात घट हमखास होणार आहे.